ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गॅस सिलेंडरपासून आरोग्य विम्यापर्यंत ६ हे नवे बदल, जाणून घ्या

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 29, 2020 09:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

गॅस सिलेंडरपासून आरोग्य विम्यापर्यंत ६ हे नवे बदल, जाणून घ्या

शहर : मुंबई

कोरोना संकट काळाच्या पार्श्वभुमीवर येत्या ऑक्टोबरपासून तुमच्या आयुष्यात काही नवे बदल होणार आहेत. या नव्या महिन्यात सणांची सुरुवात होतेय. दरम्यान सरकारतर्फे अनलॉक ची घोषणा होईल. हवाई मार्ग, मिठाई, गॅस सिलेंडर, आरोग्य विमा सहीत अनेक गोष्टींमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत. याचा परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणारेय. त्यामुळे याची माहिती असणं गरजेचं आहे.

गॅस सिलेंडर किंमत

तेल मार्केटींग कंपन्या दर महिन्याच्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडर आणि हवाई इंधनाच्या नव्या किमतींची घोषणा करतात. गेल्या काही महिन्यांमध्ये यामध्ये काही चढ उतार पहायला मिळाले. ऑक्टोबरपासून एलपीजी किंमती वाढ किंवा घट होऊ शकते. याच्या मानसिक आणि आर्थिक परिणामासाठी तुम्ही तयार रहायला हवं.

मिठाईचे नियम

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) एक आदेश जारी करून मिठाईच्या दुकानांना दुकानात उपलब्ध असलेल्या सर्व मिठाईची मुदत संपण्याची तारीख किंवा 'आधीची बेस्ट तारीख' जाहीर करणे अनिवार्य केले आहेऑक्टोबर पासून आदेश अमलात आणला जाईल. आता, मिठाईच्या दुकानात सर्व मिठाईसमोर 'तारखेपूर्वीचे सर्वोत्कृष्ट' असं नमूद करणे आवश्यक असेल. दुकानदारांना आता मिठाईचा कालावधी पूर्ण होण्याच्या तारखेपूर्वी विकाव्या लागतील.

ड्रायव्हींग लायसन्स

केंद्र सरकारने मोटर वाहन नियम १९८९ मध्ये संशोधन केले आहे. ऑक्टोबर २०२० पासून वाहतूक संदर्भातील नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहे. ड्रायव्हींग लायसन्स आणि चलान सहित वाहनांशी संबधित कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये अधिकृत आढळलेल्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होणार नाही. ट्रॅफीक पोलिसांकडे तुमच्या ड्रायव्हींग लायसन्स संदर्भातील सर्व माहीती आधीच असणार आहे. तसेच रद्द किंवा अवैध झालेल्या लायसन्सची माहिती देखील यावर असणार आहे. ही माहीती वेळोवेळी अपडेट केली जाणार आहे.

गाडी चालवताना..

गाडी चालवताना रुट नेविगेशनसाठी मोबाईलचा वापर होतो. पण हा वापर अशा पद्धतीने करायचा आहे की गाडी चालवताना कोणता अडथळा येऊ नयेअन्यथा हजार ते हजारपर्यंत दंड होऊ शकतो. रस्ते परिवहन मंडळाने यासंदर्भात माहिती दिली.

आरोग्य विमा

आरोग्य विम्या अंतर्गत तुम्हाला जास्त सुविधा मिळतील. या पॉलिसींमध्ये ऑक्टोबरपासून काही महत्वाचे बदल होणार आहेत. यामुळे हेल्थ इंश्युरन्स पॉलिसीचे नियम स्टॅंडराइज आणि ग्राहक केंद्रीत होणार आहेत. यात इतर काही बदल देखील आहेत.

परदेशात पैसे पाठवण महाग

केंद्र सरकारने परदेशात पैसे पाठवण्यावरील टॅक्स संदर्भात नियम जोडलाय. ऑक्टोबरपासून हा नियम लागू होईल. तुम्ही विदेशात शिकताय किंवा तुमच्या मुलाला पैसै पाठवताय किंवा विदेशातील तुमच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करताय तर तुम्हाला टक्के अधिक टॅक्स कलेक्टेड एट सोर्स (TCT) भरावा लागणार आहे. रिझर्व बॅंकेच्या लिबरलाइज रेमिटेंस स्किम (LRS) अंतर्गत परदेशात पैसे पाठवणाऱ्या व्यक्तींना टीसीएस द्यावे लागणार आहे.

मागे

मुंबईतील आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याचा कॉल आला आणि....
मुंबईतील आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याचा कॉल आला आणि....

शहरात एक धक्कादाय घटना घडली. काल रात्री पावणेबाराच्या सुमाराला मुंबईत बॉम्....

अधिक वाचा

पुढे  

NCB चीफ दिल्लीला परतले, आता कुणाचीही चौकशी नाही, पुराव्यांचे करणार पुनरावलोकन
NCB चीफ दिल्लीला परतले, आता कुणाचीही चौकशी नाही, पुराव्यांचे करणार पुनरावलोकन

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्स संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहित....

Read more