By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 06:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीला आज सर्वत्र मोठ्या उत्साहात श्री गजाननाची विधिवत स्थापना करण्यात आली असून गणेशोत्सवाच्या मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. यात तृतीयपंथीयही मागे नसल्याचे दिसून आले. बदलापूरात तृतीयपंथीयांच्या गुरु श्रीदेवीच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे
अवघ्या 10 बाय 10 फुटाच्या खोलीत राहणार्या श्रीदेवीच्या घरी अनेक वर्षापासून गणपतीची स्थापना करण्यात येत आहे. तसेच यल्लमा देवीचीही पूजा केली जाते. मुंबई ठाण्यातील बहूतांशी तृतीयपंथीय श्री देवीकडे या निमिताने गणेशाच्या दर्शनाला येतात. त्याचबरोबर आजूबाजूचे रहिवाशी व व्यापारीही येतात. येणार्या भाविकांचा पाहुणचार करण्यात कोणतीही कमतरता ठेवली जात नाही. येणार्या प्रत्येकाला जेवण आणि प्रसाद दिला जातो, असे श्रीदेवीने सांगितले.
'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे एसटीचे ब्रीदवाक्य. त्यानुसार गेली 7 दशके प्रव....
अधिक वाचा