By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2020 11:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये सध्या ऑनलाईन परीक्षांबाबत गोंधळाचं वातावरण आहे. त्याचवेळी मुंबई विद्यापीठाचा भोंगळ आणि बेजबाबदार कारभार समोर आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातून तीस वर्षे जुन्या ट्रॉफी चोरीला गेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे सोमवारी (19 ऑक्टोबर) हा प्रकार उघडकीस आल्यानंतरही मुंबई विद्यापीठाने अजूनही याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली नाही.
मुंबई विद्यापीठच्या मरीन लाईन्स परिसरात असलेल्या क्रीडा संकुलात हा प्रकार घडला. तीस ते पस्तीस वर्ष जुन्या ट्रॉफी चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. यामध्ये एका चांदीच्या ट्रॉफीचाही समावेश आहे. मुंबई विद्यापीठातील या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याने चोरी कशी झाली हे समजणं अवघड बनलं आहे. तसंच नेमक्या किती ट्रॉफी चोरीला गेल्या याची सुद्धा माहिती मुंबई विद्यापीठाकडे नसून याबाबत माहिती घेऊन चौकशी केली जात आहे.
मुंबई विद्यापीठ कलिना, फोर्ट परिसर आणि विविध विभागात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य सुप्रिया कारंडे यांनी मागील अनेक वर्षापासून लावून धरली होतील. तरीही अजूनही मुंबई विद्यापीठाला अद्याप जाग आलेली नाही. त्यातच क्रीडा संकुलातील जुन्या ट्रॉफी चोरीला गेल्याने विद्यापीठाचा बेजबाबदार कारभार समोर येत आहे.
अनेक महत्त्वाच्या ट्रॉफी ज्या मुंबई विद्यापीठाने बऱ्याच स्पर्धांमध्ये कमावल्या त्या सगळ्या चोरीला गेल्याने आता याची जबाबदारी कोण घेणार, अस प्रश्न सिनेट सदस्य आणि विद्यार्थी संघटना विचारत आहेत.
कोरोनाला थोपवण्यासाठी हैदराबाद स्थित भारत बायोटेक (Bharat biotech) कंपनीकडून कोव्ह....
अधिक वाचा