By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 17, 2020 03:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव वाढला असून महाराष्ट्रातला कोरोनाबाधित पहिला बळी हा मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात गेला. ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोरोना व्हायरसमध्ये दगावले आहेत. महाराष्ट्र कोरोना प्रादुर्भावात दुसऱ्या स्तरावर आहे. पुढचा आठवडा हा मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेचा आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत 'वर्क फ्रॉम होम' या पर्यायावर २५ खासगी कंपन्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं.
गर्दीची ठिकाणं टाळावीत असे राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अशावेळी 'वर्क फ्रॉम होम' हा उत्तम पर्याय आहे. पूर्वकाळजी म्हणून महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी खासगी कंपन्यांना एकूण कर्मचाऱ्यांच्या फक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्याचे तसंच इतरांना घरुन काम करण्याची मुभा देण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी त्यांनी आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.
'वर्क फ्रॉम होम' पर्याय कुणाला फायदेशीर
गरोदर महिला, दम्याचा त्रास असणारी व्यक्ती, हृदयाशीसंबंधित त्रास असणारी व्यक्ती, डायबेटिस असणारी व्यक्ती आणि थकवा जाणवणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. अशा व्यक्तींकरता वर्क फ्रॉम होम हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. त्याचप्रमाणे जगाची आताची परिस्थिती पाहता वर्क फ्रॉम होम हा पर्याय प्रत्येकासाठीच फायदेशीर आहे. जेणे करून प्रत्येक व्यक्ती हा आपल्या घरीच आयसोलेटेड राहू शकतो.
'वर्क फ्रॉम होम' पर्याय कुणाला उपलब्ध
अनेक खासगी कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम हा पर्याय वापरला जातो. ज्या खासगी कंपन्या डिजीटलशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. एवढंच नव्हे तर परदेशी कंपन्या ज्या भारतात कार्यरत आहेत; त्या कंपन्या देखील वर्क फ्रॉम होम हा पर्याय वापरतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मुंबई सारख्या मेट्रोपोलिटन शहरात 'वर्क फ्रॉम होम' पर्याय वापरण्याचा विचार केला जात आहे.
असा वापरला जातो 'वर्क फ्रॉम होम' पर्याय
वर्क फ्रॉम होम या पर्यायात कर्मचारी आपल्या घरूनच काम करतो. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना वेळेचं बंधन देतात. तर काही खासगी कंपन्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रोजेक्टनुसार काम करण्याची अनुमती देतात. अशा कंपन्यांमध्ये आयटी डेव्हलपमेंट सेक्टरचा समावेश असतो. तसेच डिजिट वर्क करणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये पिक-अप ड्रॉपची व्यवस्था नसल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना दुपारी ३ ते रात्री १२ ही शिफ्ट घरून करण्याची परवानगी आहे.
सेंट गोबेन या खासगी कंपनीतील टेक्निकल हेडकडून नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती मिळाली आहे. आयटी डेव्लपमेंट सेक्टरमध्ये अनेकदा वर्क फ्रॉम होम हा पर्याय असतो. प्रोजेक्टनुसार कर्मचाऱ्याच्या कामाच्या वेळा ठरवल्या जातात. खासगी कंपन्यांमध्ये हा पर्याय उपलब्ध असतो. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या कंपनीने पहिल्यांदाच सगळ्या कर्मचाऱ्यांना एकाचवेळी वर्क फ्रॉम होम देऊन संपूर्ण ऑफिस ब्लॅक आऊट ठेवण्याचा निर्णय घेतला. महत्वाचं म्हणजे ही ड्रील यशस्वी देखील झाली. राज्य सरकारच्या आदेशापर्यंत ३१ मार्चपर्यंत आम्हाला हा पर्याय देण्यात आला आहे.
'वर्क फ्रॉम होम'चा काय फायदा
आप्तकालीन काळात वर्क फ्रॉम होम हा उत्तम पर्याय आहे. इंटरनेट, लॅपटॉप या दोन गोष्टी उपलब्ध असल्यावर कर्मचारी जगाच्या पाठीवर कुठूनही कंपनीच काम करू शकतो. यामुळे कोणतंही काम अडत नाही. तसेच वर्क फ्रॉम होम या पर्यायामुळे व्यक्ती अडचणीच्या काळातही उपलब्ध राहू शकतो.
या पर्यायामुळे कंपनीचाच सर्वाधिक फायदा होईल. कंपनीचा उत्पादन खर्च वाचेल, विजेच्या बिलात फरक पडेल तसेच कर्मचाऱ्याचा प्रवासाचा वेळ वाचेल. मुंबई सारख्या शहरात कर्मचारी प्रवासातच थकतो. त्याची ही ऊर्जा कामात वापरता येईल. कर्मचाऱ्यांचा रेल्वे प्रवास वाचेल आणि पर्यायाने मुंबईत होणारे रेल्वे अपघात यामुळे कमी होतील.
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासा....
अधिक वाचा