ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जेट एअरवेजचे वैमानिक १ एप्रिलपासून काम बंद आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: मार्च 31, 2019 01:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जेट एअरवेजचे वैमानिक १ एप्रिलपासून काम बंद आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

शहर : मुंबई

जेट एअरवेजचे वैमानिक १ एप्रिलपासून काम बंद आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे समजतं आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे थकीत वेतन चुकते करण्याच्या मागणीसाठी वैमानिकांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे जेटची सेवा कोलमडणार आसल्याचे संकेत आहेत. चार महिन्यांपासून अनियमित वेतन मिळत असल्याने जेट एअरवेजच्या वैमानिक आणि अभियंत्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला होता. तर, जेट एअरवेजने ३१ मार्चपर्यंत थकीत वेतन न दिल्यास आणि कंपनीने आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत योजना सादर न केल्यास १ एप्रिलपासून आंदोलन करण्याची भूमिका नॅशनल अ‍ॅव्हिएटर्स गिल्डने मांडली होती.

 या संघटनेत जेटच्या १,१०० वैमानिकांचा समावेश आहे. तर, याच पाश्र्वभूमीवर कर्जातून बाहेर पडण्यासाठीच्या योजनेनुसार कंपनीचे नेतृत्व कर्जदात्या एसबीआयकडे आले. त्यामुळे २९ मार्चपर्यंत निधी हस्तांतरित होऊन वेतन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही आणि जेटचे  कर्मचारी वेतनापासून वंचितच राहिले. त्यामुळे जेटचे वैमानिक, अभियंते, केबिन क्रू सह सर्वच कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त करत १ एप्रिलपासून संपाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय. असे नॅशनल अ‍ॅव्हिएटर्स गिल्डचे अध्यक्ष करन चोप्रा यांनी सांगितले आहे.

 

मागे

 धोकादायक बवलेल्या पादचारी पूलाचा वापर रेल्वे प्रशासनाचं दुर्लश
धोकादायक बवलेल्या पादचारी पूलाचा वापर रेल्वे प्रशासनाचं दुर्लश

माटूंगा रोडवरील पूलानंतर आता डोंबिवलीतही धोकादायक बवलेल्या पादचारी पूलाच....

अधिक वाचा

पुढे  

भांडुपमध्ये विचित्र अपघातात एकाचा मृत्यू
भांडुपमध्ये विचित्र अपघातात एकाचा मृत्यू

भांडुपच्या नरदास नगर परिसरात घडलेल्या विचित्र अपघातात एका व्यक्तीचा दुर्....

Read more