By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 11:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - गोवंडी येथे साफसफाईसाठी सांडपाण्याच्या टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा सोमवारी दुपारी गुदमरून मृत्यू झाला. टाकीतील विषारी वायूमुळे या कामगारांचा मृत्यू ओढवला. ते तिघेही नाका कामगार होते.
गोवंडी पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या मोरया एसआरए सोसायटीच्या आवारात सोमवारी दुपारी १२च्या सुमारास ही दुर्घटना घडली. सोसायटीची सांडपाण्याची वाहिनी सतत तुंबत असल्याने टाकी साफ करण्यासाठी तीन दिवसांपासून विश्वजीत देवनाथ (वय ३२) हा कामगार येत होता. मात्र सोमवारी काम अधिक असल्याने दुपारी १२.३० वाजता संतोष कळशेकर (५४) आणि गोविंद चोटूटिया (३४) या आणखी दोन नाका कामगारांना घेऊ न तो आला. त्यानंतर पहिल्यांदा विश्वजीत टाकीत उतरला. मात्र बराच वेळ तो बाहेर न आल्याने त्याला शोधण्यासाठी दुसरा कामगार टाकीत उतरला. तोही बाहेर न आल्याने त्याला शोधण्यासाठी तिसरा कामगार टाकीत उतरला.
काही वेळाने इमारतीचा सुरक्षारक्षक तेथे आला. त्याला टाकीची झाकणे उघडी दिसली. शिवाय कामगारांच्या चप्पल आणि इतर साहित्यही झाकणाजवळ आढळले. त्याने गोवंडी पोलीस आणि अग्निशमन यांना या प्रकाराची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी टाकीत उतरून, तिघांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांनी दिली.
औरंगाबाद - औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याची वाढलेली अपघाताच....
अधिक वाचा