ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

खेळता-खेळात तीन भावंड गाडीत अडकले, श्वास गुदमरून मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 01:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

खेळता-खेळात तीन भावंड गाडीत अडकले, श्वास गुदमरून मृत्यू

शहर : देश

मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यात शुक्रवारी एक हृदयद्रावक तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आलीय. खेळता-खेळता एका गाडीमध्ये अडकलेल्या तीन चिमुकल्यांचा श्वास गुदरमरून मृत्यू झालाय. हे तिघेही सख्खे भाऊ-बहिण होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलांची ओळख पूनम ( वर्ष), बुलबुल ( वर्ष) आणि प्रतिक ( वर्ष) अशी पटलीय. तीनही मुलं सकाळीच खेळण्यासाठी बाहरे पडले होते. शेजारीच्या एका रिकाम्या जमिनीवर उभ्या असलेल्या एका कारमध्ये हे तिघेही बहिण-भाऊ खेळता-खेळता शिरले. या गाडीचा दरवाजा आतून बंद झाला... आणि त्यातून बाहेर कसं पडावं हे या मुलांना लक्षात आलं नाहीगाडी आतून लॉक झाल्यानं तिनही मुलं आत अडकली होती. जवळपास तीन तास ते गाडीच्या आत होते परंतु, त्यांना दरवाजा उघडता आला नाहीही बंद गाडी गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच जागी उभी होती. त्यामुळे तिच्याकडे कुणाचं लक्षही नव्हतं. बऱ्याच वेळानंतर तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीचं लक्ष या गाडीवर पडलं... आणि आत मुलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

आरडा-ओरडा करत त्यांनी आजुबाजुच्या लोकांच्या मदतीनं तीनही मुलांना बाहेर काढलं. तीनही मुलं निपचीत पडली होती. बेशुद्धावस्थेतच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तीनही मुलांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आलाय.

 

मागे

सुरतमध्ये इमारतीला आग, जीव वाचवण्यासाठी लोकांच्या इमारतीवरुन उड्या, १५ जणांचा मृत्यू
सुरतमध्ये इमारतीला आग, जीव वाचवण्यासाठी लोकांच्या इमारतीवरुन उड्या, १५ जणांचा मृत्यू

 सुरतमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये १५ लोकांचा दुर्देव....

अधिक वाचा

पुढे  

संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यावर मोदी संविधानासमोर नतमस्तक
संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यावर मोदी संविधानासमोर नतमस्तक

एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएच्या संसदीय दलाच्या नेते....

Read more