By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 02:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
औरंगाबाद - येथील रस्त्यावरील इसारवाडी फाट्याजवळ कंटेनर व मोटारीच्या झालेल्या अपघातात अहमदनगर जिल्ह्यतील शेवगाव तालुक्यातील तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. औरंगाबाद येथून भरधाव पठणकडे मशिनरी घेऊन जाणारे कंटेनर (जीजे०६-एझेड ६८५१) व मोटार (एमएच१२- सीके३४६८) यांची धडक झाली. यामध्ये मोटार चालक बाळासाहेब निवृती डाके (वय ४५), अंबिका बाळासाहेब डाके (वय ४०, दोघे रा. ढोरजळगाव ता. शेवगाव) हे पती-पत्नी व बाळासाहेब डाके यांची सासू सुमन रघुनाथ नरवडे (वय ६५) या जागीच ठार झाल्या. अपघात होताच कंटेनरचालक पळून गेला.
या अपघाताची माहिती इसारवाडी येथील ग्रामस्थांना मिळताच त्यांनी पठण एमआयडीसी पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांच्या मदतीने मोटारीमधील मृत व्यक्तींना बाहेर काढून पठण येथील शासकीय रुग्णालयात हलवले. देवीदास डाके यांच्या फिर्यादीवरून कंटेनरचालकाविरुद्ध एमआयडीसी पठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास औरंगाबाद ग्रामीण पोलीस करीत आहेत.
मुंबई - राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी....
अधिक वाचा