ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सांगलीत दोन अपघातांमध्ये १७ जणांचा मृत्यू

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2020 03:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सांगलीत दोन अपघातांमध्ये १७ जणांचा मृत्यू

शहर : सांगली

            सांगली : रविवारी सांगलीत वेगवेगळ्या अपघातांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरीकडे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर यावल तालुक्यातील हिंगाणा गावाजवळ डम्पर आणि क्रूझरला धडक बसल्याने १२ जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. या अपघातात मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा समावेश आहे. मुक्ताईनगरच्या चिंचोल येथील चौधरी कुटुंबीय नवविवाहितेच्या स्वागतसोहळ्यासाठी रविवारी चोपडय़ाला गेले होते. 

           कार्यक्रम झाल्यानंतर क्रूझर वाहनातून परत येत असताना मध्यरात्री अपघात झाला. अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी सांगितले. दुसऱ्या अपघातात नातलगाच्या अंत्यविधीला निघालेल्या पाच जणांवरच काळाने झडप घातली. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आटपाडी तालुक्यातील पारेकरवाडीत दोन महिलांसह पाच जणांचा मोटार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून अपघाती मृत्यू झाला. सोमवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मागे

सियाचिनमध्ये जवानांसाठी कपडे व खाद्यपदार्थांचा तुटवडा
सियाचिनमध्ये जवानांसाठी कपडे व खाद्यपदार्थांचा तुटवडा

              नवी दिल्ली : सियाचिन आणि लडाखसारख्या अतिउंच भागात शरीर गो....

अधिक वाचा

पुढे  

गेल्या १० वर्षात ११०० जवानांची आत्महत्या
गेल्या १० वर्षात ११०० जवानांची आत्महत्या

       टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तपत्राच्या सहाय्याने सैन्यामधील ....

Read more