ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गडचिरोलीमध्ये भीषण अपघात 3 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 04:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गडचिरोलीमध्ये भीषण अपघात 3 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

शहर : ahiwara

गडचिरोलीतील आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ आज सकाळी 11  वाजण्यासच्या सुमारास भीषण अपघात घडला. यामध्ये 3 जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ दोन भरधाव वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये 1 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे. कोमा बंडू लेकामी (43), झुरी दस्सा गावडे (70) व चुक्को करपा आत्राम (70) सर्व, रा. कोळसेपल्ली, अशी मृतांची नावे आहेत. मासा पेंटा तलांडी (45), ढोबी केसा आत्राम (70), चिना इरपा तलांडी (70), बाबाजी गोंगले (70) सर्व रा. कोळसेपल्ली व पोचा जोगी तलांडी (55) रा.पालेकसा हे जखमी झाले आहेत. जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मागे

राज्यात विज कोसळून दोन दिवसांत 7 जणांचा मृत्यू
राज्यात विज कोसळून दोन दिवसांत 7 जणांचा मृत्यू

गेल्या दोन दिवसामध्ये अवकाळी पाऊस आणि विज कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाल....

अधिक वाचा

पुढे  

मध्य आणि हार्बर रेल्वेवर सलग दुसर्‍या दिवशी अघोषित ब्लॉक
मध्य आणि हार्बर रेल्वेवर सलग दुसर्‍या दिवशी अघोषित ब्लॉक

सलग दुसर्‍या दिवशी मध्य आणि हार्बर रेल्वेवर अघोषित ब्लॉक घेण्यात आला आहे. ....

Read more