ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतीय वायू सेनेची ताकद अजून वाढणार!, आज ३ 'राफेल' विमान भारतात दाखल होणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 04, 2020 10:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतीय वायू सेनेची ताकद अजून वाढणार!, आज ३ 'राफेल' विमान भारतात दाखल होणार

शहर : देश

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाची ताकद अजून वाढणार आहे. आज 3 राफेल विमान भारतीय वायू दलात दाखल होणार आहेत. हे 3 राफेल विमान भारतात दाखल होताना रस्त्यात कुठेच इंधन भरणार नाहीत, अशी माहिती भारतीय वायू दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही विमानं भारतात दाखल झाल्यानंतर जामनगरमध्ये एक दिवस मुक्काम करतील. त्यानंतर ती अंबाला एअरबेसवर पोहोचतील. महिनाभरापूर्वी भारतीय वायूसेनेची एक टीम फ्रान्समध्ये या विमानांची समिक्षा करण्यासाठी फ्रान्सला गेली होती.

फ्रान्स आणि भारतात एकूण 36 राफेल विमानांचा करार झाला आहे. यातील 5 राफेल विमानं 29 जुलैला अंबाला एअरबेसवर दाखल झाली आहेत. त्यानंतर 10 सप्टेंबरला त्यासंबंधी औपचारिक कार्यक्रम घेण्यात आला. फ्रान्सने भारताला दर 2 महिन्यात 3 ते 4 राफेल विमान देण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार 36 राफेल विमान भारतीय वायूसेनेची ताकद वाढवणार आहेत.

सध्या चीन आणि पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर कुरघोडी सुरुच आहे. लडाख सीमेवरील चीनच्या घुसखोरीचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राफेल भारतात दाखल होत असल्यानं भारतीय वायू दलाची ताकद अधिक वाढणार आहे.

लडाख सीमेवर राफेल तैनात

यापूर्वी जून 1997 मध्ये भारताने रशियाकडून 30 सुखोई विमानं खरेदी केली होती. त्यानं जवळपास 23 वर्षांनी भारताने फ्रान्सकडून राफेलसारख्या अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमानांची खरेदी केली आहे. भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूसेनेने लडाख सीमेवर राफेल तैनात केले आहेत.

राफेल विमानाची वैशिष्ट्ये

राफेल हे 2 इंजिन असलेलं अनेक कामं करू शकणारं मध्यम आकाराचं लढाऊ विमान

लांब असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याच्या दृष्टीनं राफेलची निर्मिती

हवेतून मारा करणं, हवेतल्या हवेत इंधन भरणं, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणं त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता

हवेत 150 किलोमीटरपर्यंत तर हवेतून जमिनीवर 300 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची अण्वस्त्रसज्ज राफेलची क्षमता

मागे

अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्र सरकारची कारवाई आणीबाणीसारखी
अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्र सरकारची कारवाई आणीबाणीसारखी

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर केंद्र सरकारची पहिली....

अधिक वाचा

पुढे  

अल्प बुद्धी, बहु गर्वी... अमृता फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
अल्प बुद्धी, बहु गर्वी... अमृता फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जागेला पर्याय म्हणून मुख्यमंत्र्यांनी कांजूरम....

Read more