By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 12:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
तिहार जेलच्या 150 हिंदू कैद्यांनी यंदा रोजा ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रोजा पाळणार्या हिंदू कैद्यांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षी 59 हिंदू कैद्यांनी रोजा ठेवला होता. तुरुंगातील मुस्लिम कैद्यांसोबतचा बंधूभाव वाढावा, एकता कायम राहावी, यासाठी बरेचसे हिंदू कैदी रोजा ठेवत असल्याची माहिती तुरुंगातील अधिकार्यांनी दिली.
’तिहार तुरुंगात एकूण 16 हजार 665 कैदी आहेत. यातल्या 2 हजार 658 कैद्यांनी रोजा पाळला आहे. यात हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांच्या कैद्यांचा समावेश आहे. आम्ही त्यांच्यासाठी विशेष आयोजन केलं आहे. यंदा रोजा ठेवणार्या मुस्लिमांचं प्रमाण वाढलं आहे. ही वाढ जवळपास तिप्पट आहे,’ अशी माहिती तुरुंग प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी दिली. ’मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिहारमधल्या विविध तुरुंगात असलेल्या हिंदू कैद्यांनी त्यांच्या अधीक्षकांची भेट घेतली. त्यांना रोजा ठेवायचा असल्याची माहिती त्यांनी अधीक्षकांना दिली. यानंतर अधीक्षकांनी रोजा ठेवणार्या एकूण कैद्यांची मोजणी केली. यानंतर त्यांच्यासाठी विशेष आयोजन करण्यात आलं,’ असं प्रवक्त्यांनी सांगितलं.
जुन्या महामार्गाला जोडणार्या मार्गिकेवरील उर्से खिंडीत सुट्टे झालेल्य....
अधिक वाचा