By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 24, 2020 11:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आता शाळांबाबतही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत (Maharashtra Schools Online Education Timetable). याबाबत सरकारने काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.शाळा सुरु करण्यासंदर्भात महाराष्ट्र उप सचिव राजेंद्र पवार यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आता सोमवार ते शुक्रवार असे आठवड्याचे 5 दिवस ऑनलाईन शाळा सुरु होणार आहे. यात वर्गनिहाय तासिकांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार पूर्व प्राथमिक वर्गांसाठी रोज 30 मिनिटांचा पालकांशी संवाद करण्यात येईल.
प्राथमिक वर्गांमध्ये पहिली ते दुसरीसाठी दररोज 30 मिनिटांचा विद्यार्थ्यांचा वर्ग असेल, तर 15 मिनिटं पालकांशी संवाद केला जाणार आहे. तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी तासिकेचा वेळ वाढवण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांसाठी दररोज 45 मिनिटांची तासिका असेल. याचे एकूण 4 सत्रं होतील. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील दररोज 45 मिनिटांचे 4 सत्रं असणार आहेत.
वर्गनिहाय तासिकांचं वेळापत्रक
पूर्व प्राथमिक- : रोज 30 मिनिटं, पालकांशी संवाद
प्राथमिक -: पहिली ते दुसरी : रोज 30 मिनिटं, 15 मिनिटं पालकांशी संवाद
तिसरी ते आठवी -: 45 मिनिटांची 4 सत्रं
नववी ते बारावी -: 45 मिनिटांची 4 सत्रं
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “शाळा बंद राहिली तर शिक्षण बंद नको व्हायला. त्यात मुलांचं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण ऑनलाईन, ऑफलाईन, गुगल, टेलिव्हिजनच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रयत्न सुरु आहे. यासोबत शाळा सुरु कधी करायच्या याबाबत स्थानिक प्रशासन आणि पालकच यावर निर्णय घेतील. त्यांना तेथील परिस्थितीची अधिक चांगली माहिती असते.”
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आरोग्य यंत्रणा आणि जि....
अधिक वाचा