By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 16, 2019 12:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई-रत्नागिरीत चिपळूनमध्ये मुसळधार पावसाने २ जुलै रोजी तिवरे धरण फुटून २३ जन मृत्यूमुखी पडले. त्यापैकी २० जंणाचे मृतदेह सापडले, तर तिघांचा शोध लागलाच नाही. आता हे उध्वस्त झालेले गाव दत्तक घेण्याचा निर्णय मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक न्यासाने घेतला आहे, अशी माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली. रत्नागिरीचे आमदार उद्य सामंत यांनी तिवरे गाव दत्तक घेण्याची विनंती सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडे केली आहे.
तिवरे गावातील उध्वस्त झालेली घरे, शाळा सिद्धिविनायक मंदिर न्यास नव्याने बांधून देणार आहेत. तसेच गृहउपयोगी साहित्यही उपलब्ध करून देणार आहे.
मुंबई मुंबईतील दुर्दैवी घटकांची मालिका काही थांबत नाही. गोरेगाव आणि वरळी य....
अधिक वाचा