By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 03, 2019 10:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे चिपळूणमधील तिवरे धरण फुटलं. यामुळे 24 जण वाहून गेले. सकाळी 10 पर्यंत सहाजणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर इतरांचा शोध बचाव पथकाकडून सुरू आहे. धरण फुटल्यानं परिसरातील 13 घरं वाहून गेली. यामुळे या भागात सध्या भीतीचं वातावरण आहे.
तिवरे धरण परिसरात नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणातही वरुणराजा तुफान बरसत आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं चिपळूणमधील तिवरे धरण काल रात्री साडेआठच्या सुमारास भरलं. त्यानंतर ते ओव्हरफ्लो झालं. थोड्याच वेळात धरणाला भगदाड पडलं आणि परिसरात खळबळ माजली. यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली.
जोरदार पाऊस झाल्यास धरण फुटू शकतं, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली होती. त्यांनी याबद्दलची तक्रार पाटबंधारे विभागाकडेदेखील केली होती. यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली. धरणाचं ओव्हरफ्लो होणारं पाणी वशिष्ठीच्या खाडीला आणि शास्त्री नदीला जाऊन मिळत असल्यानं धरणाला धोका नसल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं होतं.
स्थानिकांनी व्यक्त केलेली भीती काल रात्री खरी ठरली. धरण फुटल्यानं ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांमध्ये पाणी शिरलं. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यानं 24 जण वाहून गेले. धरण परिसरातील 13 घरंदेखील प्रवाहात वाहून गेली. यामुळे मोठी वित्तहानी झाली. सध्या एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे.
पावसामुळं अख्खी मुंबई बुडाली असताना आणि मुंबईकर बेहाल झालेले असताना सत्ता....
अधिक वाचा