ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी उद्या मनसेचा सविनय कायदेभंग

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2020 11:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी उद्या मनसेचा सविनय कायदेभंग

शहर : मुंबई

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. रेल्वे सुरु व्हावी या मागणीला घेऊन सोमवारी मनसे सविनय कायदेभंग आंदोलन करणार आहे. रेल्वे पोलिसांकडून आंदोलन करण्याची नोटीसद्वारे सूचना देण्यात आली आहे. आंदोलन केल्यास नियमानुसार कारवाई करणार असल्याचं रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

मनसेकडून रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी, सरकारला वारंवार विनंती करण्यात आली आहे. मात्र सरकार अद्यापही रेल्वे सुरु करत नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदालापूर, पालघरपासून येणाऱ्या अनेक लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. विनंती करुनही सरकार ऐकत नसल्याने सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सविनय कायदेभंग करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोमवारी जनतेच्या हितासाठी मनसे रेल्वेतून प्रवास करणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.

लॉकडाऊन काळात रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु आहे. इतर लोकांना बसने प्रवास करावा लागतो आहे. बस प्रवासात लोकांची मोठी गर्दी होत आहे. चाकरमान्यांना बसमधून प्रवास करण्यासाठी 2-2 तास लाईनमध्ये उभं राहावं लागतं आहे. त्यामुळे अनेकांचे मोठे हाल होत आहेत. यापूर्वी मनसेकडून मुख्यमंत्र्यांना रेल्वे सुरु करण्यासाठी पत्रही पाठवण्यात आलं होतं. अनेकदा मनसेने रेल्वे सुरु करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

 

मागे

मंत्रालय बनलंय मृत्यूचा सापळा! 100 टक्के उपस्थितीबाबत फेरविचार करण्याची मागणी
मंत्रालय बनलंय मृत्यूचा सापळा! 100 टक्के उपस्थितीबाबत फेरविचार करण्याची मागणी

कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सज्ज असलेल्या राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयात ....

अधिक वाचा

पुढे  

शेतकरी विधेयकांच्या मंजुरीसाठी आज भाजपची राज्यसभेत कसोटी
शेतकरी विधेयकांच्या मंजुरीसाठी आज भाजपची राज्यसभेत कसोटी

सध्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरत असलेल्या शेतकरी विधेयकांच्या मंजुरीस....

Read more