By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 09:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज दिवसभरात राज्यात 11 हजार 514 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 316 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाणही वाढतं आहे. राज्यात आज 10 हजार 854 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 79 हजार 779 इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 3 लाख 16 हजार 375 कोरोनाग्रस्त बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 65.94 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 1 लाख 46 हजार 305 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण 16 हजार 792 जण कोरोनामुळे दगावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.50 टक्के इतका आहे.
11,514 #COVID19 cases & 316 deaths reported in Maharashtra today. Total number of cases in the state is now at 4,79,779, including 1,46,305 active cases, 3,16,375 recovered & 16,792 deaths: State Health Department pic.twitter.com/UNPYwHDZgQ
— ANI (@ANI) August 6, 2020
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या एकट्या मुंबईत आहे. मुंबईत आतापर्यंत 1,20,150 कोरोनाग्रस्त आढळले. तर मुंबईत आतापर्यंत 92,659 रुग्ण बरेही झाले आहेत. मुंबईत 20546 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 6648 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्यात 9 लाख 76 हजार 332 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 37 हजार 768 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
औषध कंपनी Zydus Cadila कोरोना वॅक्सिन तयार करण्याच्या प्रक्रियेत वेगाने काम करत आह....
अधिक वाचा