By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 01:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ahmedabad
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम.कृष्णा यांचे जावई व सीसिडीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ याच आठवड्यात सोमवारी रात्री बेपत्ता झाले. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह नदीत आढळला ही घटना ताजी असताना जीवनाला कंटाळून गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील लाकडाचा व्यापारी नवीन पटेल बिहारच्या रांचीमध्ये बेपत्ता झाल्याचे प्रकरण समोर आले. नवीन पटेल अतिशय तणावाखाली असल्याचे त्यांनी पाठवलेल्या व्हाट्सअप मेसेजमुळे दिसून येते. त्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत. त्याने 30 जुलै ला मेव्हण्याला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, "भगवान भाई मी आत्म हत्या करीत आहे. आयुष्याला कंटाळलोय. सकाळी ध्रुव आणि जसुला (पत्नी) आपल्या घरी घेऊन जा. रांचीमध्ये एखाद्या जागी आत्महत्या करेन. मी माझ्या मुलाचं आणि पत्नीचे आयुष्य उध्वस्त केलय " यानंतर नवीन पटेल बेप्पता आहेत, त्यावरून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे
जून महिना पावसाचा कोरडा गेला आणि मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते, म....
अधिक वाचा