ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Night Curfew: हॉटेल व्यावसायिकांनंतर व्यापारी आक्रमक, नाईट कर्फ्यूला विरोध

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 22, 2020 11:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Night Curfew: हॉटेल व्यावसायिकांनंतर व्यापारी आक्रमक, नाईट कर्फ्यूला विरोध

शहर : मुंबई

यूकेमधील कोरोना विषाणूच्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केलीय. राज्य सरकारच्या या निर्णयाला हॉटेल व्यावयसायिकांनंतर व्यापाऱ्यांनी देखील विरोध केला आहे. आहार संघटनेनंतर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशनने मुंबईतील नाई कर्फ्यूला विरोध केला आहे. कोरोना विषाणूसोबत राज्य सरकारने व्यापाऱ्यांच्याही हिताचा विचार करावा, अशी मागणी एफआरटीडब्ल्यूओचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केलीय.(Traders opposed decision of Night Curfew implemented in Municipal Corporations)

हॉटेल व्यावसायिकांनंतर व्यापाऱ्यांचाही विरोध

आहार संघटनेनंतर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशनने मुंबईतील कर्फ्यूला विरोध केला आहे. कोरोनासोबत व्यापाऱ्यांच्या हिताचाही सरकारने विचार करावा, अशी मागणी एफआरटीडब्ल्यूओचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केली आहे. लॉकडाऊनमध्ये हॉटेल, बार, दुकानदारांचं कंबरडं मोडलं, त्यामुळे सरकारने नाईट कर्फ्यूबाबत पुन्हा विचार करावा, असं आवाहन विरेश शाहांनी केले आहे.

मनपानं सूट द्यावी, व्यापाऱ्यांची मागणी

मुंबई महापालिकेने हेल्थ परवाने, दुकानाचे परवाने, प्रॉपर्टी टॅक्स, पाणी बील यामध्ये सुट द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. जर व्यवसाय बंद झाला तर टॅक्स कसा भरणार असा सवाल एफआरटीडब्ल्यूओचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केला. (Traders opposed decision of Night Curfew implemented in Municipal Corporations)

हॉटेल व्यावसायिकांचाही विरोध

राज्य सरकारने 5 जानेवारीपर्यंत रात्रीच्या संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केलीय. हॉटेल सुरु ठेवण्यासाठी 11 ची वेळ दीड वाजेपर्यंत वाढवून द्यावी,अशी मागणी करण्यात आलीय. आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा व्यवसायाचा काळ असतो. या काळातच हॉटेल सुरु ठेवण्यास कमी वेळ मिळाला तर मोठे नुकसान होईल, असं शेट्टी यांनी सांगितले. लॉकडाऊन नंतर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्या नियमावलीचे पालन करत हॉटेल व्यावसाय सुरू केले. पण, आताच्या महापालिकेच्या आणि राज्य सरकारच्या निर्णयाने हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प होईल. यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केली.

आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय. हॉटेल सुरु ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

 

मागे

Farmer Protest | दिल्लीतील आंदोलनातून परतलेल्या पंजाबच्या शेतकऱ्याची आत्महत्या
Farmer Protest | दिल्लीतील आंदोलनातून परतलेल्या पंजाबच्या शेतकऱ्याची आत्महत्या

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यासाठी दिल्लीच्य....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत ऑटो, टॅक्सी प्रवास महागणार? नेमकं किती द्यावे लागणार भाडं?
मुंबईत ऑटो, टॅक्सी प्रवास महागणार? नेमकं किती द्यावे लागणार भाडं?

मुंबईत ऑटो आणि टॅक्सी संघटनेनं (Auto Taxi Union)किमान मीटर भाड्यात वाढ करण्याची मागण....

Read more