By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 12:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या मोटर वाहन दुरुस्ती विधेयकात यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार यापुढे नशेत गाडी चालवणाऱ्या दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हे विधेयक मांडले. यासंदर्भात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, ही राज्यासाठी हा कायदा बंधन बंधनकारक नाही ते स्वेच्छेने हा कायदा करू शकतात. मात्र देशातील सर्व राज्यांमध्ये समान धोरण असावे असे मत गडकरींनी व्यक्त केली मोटार वाहन कायदा 1988 मध्ये दुरुस्तीनंतर व वाहनांची संबंधित परवाने देण्यासोबतच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना तरतूद करण्यात आली आहे.त्यानुसार गाडी चालवताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास पाच हजार रुपये वाहन परवाना नसल्यास दहा हजार रुपये आणि सिग्नल तोडल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. त्याचप्रमाणे अपघातात मृत्यू झाल्यास 25 हजार ते दोन लाख रुपये पर्यंत नुकसान भरपाई, तसेच गंभीर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
मुंबईत खास महिलांसाठी बेस्ट प्रशासनातर्फे येत्या तीन महिन्यात तेजस्विनी ....
अधिक वाचा