By SEJAL PURWAR | प्रकाशित: ऑगस्ट 31, 2019 02:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बर्याच दिवसांपासून वाहतुकीचे नवीन नियम व दंड आकारण्याचे कायदे निर्माण झालेले होते. परंतु आता येत्या 1 सप्टेंबरपासून देशभरात वाहतुकीचे नवीन नियम सुरू करण्यात येणार आहेत. याचबरोबर नियम तोडल्यास मोठी रक्कम दंड म्हणून आकारली जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. हे नियम येत्या सोमवारपासून लागू होण्याचे समजत आहे.
नियम तोडण्याचा किमान दंड 500 रुपयांपासुन असून कमाल दंड 25000 रुपयांपर्यंत असणार आहे, याबरोबरच 3 वर्ष तुरुंगवास देखील होऊ शकतो. अल्पवयीन मुलामुलींनी कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा पालक व वाहन मालक या दोघांनादेखील भोगावी लागणार. वाहन चालवताना परवाना नसल्यास 500 रुपये दंड स्वीकारला जात होता परंतु आता कायद्यानुसार 5000 रुपये दंड आकारला जाणार असल्याचे समोर येत आहे. याबरोबरच वाहन वेगाची मर्यादा ओलांडल्यास 2000 रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. वाहनावर 2 पेक्षा अधिक व्यक्ती असल्यावर देखील 2000 रूपयांचा दंड आकारला जाणार.
हेल्मेट सक्तीबरोबरच वाहन वेग, वाहन परवाना, वाहनाची कागदपत्रे व वाहन चालकासंबंधित असलेल्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास आतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो. वाहन नियमांचे उल्लंघन करणे आता महागात पडणार असल्याचे समोर येत आहे.
गेल्या 70 वर्षांपासून चालू असलेल्या वादाला कुठेतरी शांतता प्राप्त होण्याची....
अधिक वाचा