By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 22, 2019 11:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अकोला
राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर नवसाळ फाट्यानजीक भरधाव वेगात लोखंडी पत्रा घेऊन ओव्हरटेक करीत असलेला ट्रेलर शिवशाही बसवर धडकला. या भीषण अपघातातशिवशाही बसच्या चालकासह अंदाजे १६ ते १७ प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णवाहिकेव्दारे उपचाराकरिता अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले.प्राप्त माहितीवरून अमरावतीवरून अकोल्याकडे ७५,५८० कि.लो.लोखंडी पत्राचा रोल घेऊन जाणारा ट्रेलरच्या चालकाने ओव्हरटेक करीत ब्रेक लावले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रेलर उलटला. त्यामधील असलेला लोखंडी पत्रा रोल खाली कोसळला. हा ट्रेलर समोरून येणाऱ्या शिवशाही बसवर धडकला. यावेळी बसच्या केबिनचा चुराडा होऊन चालकासह १६ ते १७ प्रवाशी गंभीर जखमी झाले. ही बस नाशिकवरून नागपूरला जात होती. यात २६ प्रवासी प्रवास करीत होते.
जखमींना पोलीस व नवसाळ, कुरूम येथील गावकऱ्यांनी बसचा काचा फोडून बाहेर काढले व रुग्णवाहिकेव्दारे उपचाराकरिता अमरावतीला हलविले.राष्ट्रीय महामार्गवरील नवसाळ फाट्यावर हा अपघात झाला.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिल....
अधिक वाचा