ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वाहतूक नियमभंग प्रकरणी वाढविलेल्या दंड आणि शिक्षेचा फेरविचार करावा - परिवहन मंत्री दिवाकर रावते

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 12, 2019 01:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वाहतूक नियमभंग प्रकरणी वाढविलेल्या दंड आणि शिक्षेचा फेरविचार करावा - परिवहन मंत्री दिवाकर रावते

शहर : मुंबई

केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंड आणि शिक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. याबाबत जनतेमध्ये मोठा रोष असून केंद्र शासनाने याचा फेरविचार करावातसेच याबाबत मोटार वाहन कायद्यात योग्य ते बदल करावेतअसे आपण केंद्र शासनास पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासनाने लागू केलेल्या दंडवाढीसंदर्भात राज्यात जोपर्यंत राज्य शासनाची अधिसूचना निघत नाही तोपर्यंत केंद्राने लागू केलेल्या दंडवाढीची राज्यात अंमलबजावणी होणार नाहीअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. रावते म्हणालेवाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून आतापर्यंत केंद्र शासनाच्या मोटार वाहन कायदा 1988 नुसार दंड आकारणी आणि शिक्षा केली जात होती. पण यानुसार होणारी दंडाची रक्कम ही फारच कमी असल्याने वाहनचालक त्याबाबत बेफिकीर असत. हे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने आपल्या अधिकाराचा वापर करुन 2016 मध्ये दंडाच्या रकमेमध्ये थोडी वाढ केली. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि त्यांच्या जिविताचे रक्षण व्हावे हा त्याचा उद्देश होता. रस्ते सुरक्षेबाबत राज्य शासन गंभीर असून लोकांनी वाहतुकीचे नियम काटेकोर पाळावेतअशी अपेक्षा आहे.

पणदरम्यानच्या काळात केंद्र शासनाने मोटार वाहन कायदा 1988 मध्ये सुधारणा करुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंड आणि शिक्षेमध्ये मोठी वाढ केली. याबाबत देशभरात लोकांमध्ये मोठी नाराजी असून ती वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत आहे. राज्यातही या दंड आणि शिक्षावाढीबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. त्यामुळे वाढविण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा यांचा केंद्र शासनाने फेरविचार करावातसेच याबाबत मोटार वाहन कायद्यात योग्य ते बदल करावेतअसे आपण केंद्र शासनास कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.

मागे

भीषण अपघातात 6 जण ठार
भीषण अपघातात 6 जण ठार

श्री गणेशाच्या विसर्जनाच्या दिवशीच पहाटे पुणे- बंगळुरू महामार्गावर सातार....

अधिक वाचा

पुढे  

पद्म पुरस्कारासाठी 9 महिला खेळाडूंच्या नावांची शिफारस
पद्म पुरस्कारासाठी 9 महिला खेळाडूंच्या नावांची शिफारस

यावर्षी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पद्म पुरस्कारासाठी 9 महिला खेळाडूंच्....

Read more