By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 16, 2019 02:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शहरात वादळामुळे झाडे कोसळण्याच्या घटना निसर्गनिर्मित असल्याचे सांगून मुंबईच्या महापौरांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. वाऱ्याचा जोर असल्यानं झाडे कोसळण्याच्या दुर्घटना घडल्याचं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले आहे.
सुदैवाने वायू वादळ आले नाही, असे म्हणून महापौरांनी मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मुंबईतल्या झाडे कोसळण्याच्या घटनांची जबाबदारी महापौर स्वतः घ्यायला तयार नाहीत. शिवाय दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मानसिकतेतही महापालिका नाही.या पावसाळ्यात झाड पडून मृत्यू होण्याच्या दोन दुर्घटना घडल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत रिमझिम पावसासहीत सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यात मुंबईत ७६ ठिकाणी झाडं किंवा झाडांच्या फांद्या तुटल्यात. मुंबईच्या मालाडमध्ये झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मालाड पश्चिमेतल्या नरियाल वाला कॉलनी, विजयकरवाडीमध्ये ही घटना घडली. चर्चगेट येथे फलक पडून एका व्यक्तीचा मृत्यू झा होता.
कोलकात्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सो....
अधिक वाचा