By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 05:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणेमध्ये एक आनोखा विवाह सोहळ संपन्न झाला. या विवाह सोहळ्या दरम्यान जन्मभूमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका जोडप्याने पहिल्यांदा हुतात्म्यांना वंदन करून मगच लग्न करणे पसंत केले आहे. त्यांच्या या कृतीची चर्चा सध्या पुण्यातल्या पंचक्रोशीत रंगली असून समाज माध्यमात त्यांचा फोटो व्हायरल होत आहे.
कुंजीरवाडी येथील सोमनाथ गिरे यांची कन्या शीतल व आळंदी म्हातोबाची येथील मधुकर जवळकर यांचे चिरंजीव रोहन यांचा विवाह काही दिवसांपूर्वी पार पडला. यातून वधू शीतलचे काका अण्णासाहेब गिरे हे केंद्रीय राखीव दलात जवान म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आणि कुटुंबीयांनी पुलवामा येथील हल्ला आणि गडचिरोली येथील हल्ला या घटनांनी व्यथित होऊन लग्न अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. त्याही पुढे जात नव परिणीत दाम्पत्याने आधी शहिदांना वंदन करून मगच पुढील विधी केले. त्यांचे हे फोटो सध्या व्हायरल झाले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विवाहप्रसंगी विविध सामाजिक व राजकीय मान्यवर उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला आलेल्या अभिनेता आणि भाजपा खासदार किरण खेर य....
अधिक वाचा