By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 11:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, इतकेच काय पण अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या सुषमा स्वराज यांना त्यांच्या निधंनंतर कट्टर विरोधकांनीही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनाबद्दल देशभर दोन दिवसांचा दुखवटा पळण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यदरशना साथी अनेक मान्यवरांची रिघ लागली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या सुषमा स्वराज यांचे काल मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या, त्यांच्या निधनाने एका कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे.
मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या छातीत दुखू लागले, त्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पाच डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत होते, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांत यश आले नाही. अखेर सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी सुषमा यांचे पती आणि कुटुंबातील अन्य सदस्य तेथे होते. सुषमा स्वराज बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्त्यांची किडनी ट्रान्सप्लांट ही झाले होते. नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार सांभाळणार. परराष्ट्र धोरण मजबूत करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. या काळात त्यांनी सामन्यातील सामान्यांची तक्रारीची दखल घेऊन तातडीने मदत करून आपली छाप पाडली होती. सर्वात अॅक्टिव म्हणून त्यांची ख्याती होती. मोदी सरकारने कश्मीर बाबाचे 370 कलम हटवल्यानंतर सुषमा स्वराज यांनी मी आज दिवसाची वाट पाहत होते हे अखेरचे केलेले ट्विट होते. दुर्दैवाने तोच दिवस त्यांच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला. पंजाब मधील अंबाला येते 1952 मध्ये सुषमा स्वराज यांचा जन्म झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठातुन कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. त्या आऊटस्टँडिंग पार्लिमेंटेरियन सन्मानाने गौरविलेल्या पहिल्या आणि एकमेव खासदार ठरल्या.
सुषमा स्वराज वयाच्या पंचविसाव्या वर्षी 1977 मध्ये कॅबिनेट मंत्री झाल्या होत्या. त्या सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री त्या ठरल्या होत्या. त्याच्याकडे सामाजिक कल्याण रोजगार यांसारख्या आठ महत्त्वाच्या खात्यांचा कारभार होता. 1979 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षीच त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले.
तसेच कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षाच्या पहिल्या महिला नेत्या होण्याचा मानही त्यांना मिळाला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या त्या सात वेळा खासदारही राहिल्या होत्या. सुषमा स्वराज यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातून त्यांच्या जंतरमंतर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
तेथे राष्ट्रपती रामनाथ गोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, योग गुरु रामदेव बाबा, भाजपा खासदार अभिनेत्री हेमा मालिनी, केरळचे मुख्यमंत्री ओम्मेन चंन्डी आदी मान्यवरांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
दुपारी बारा वाजता सुषमा स्वराज यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी दिल्लीतील भाजपा कार्यालयात ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता लोधी रोड स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.
सुषमा स्वराज यांना मान्यवरांची श्रद्धांजली
सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही स्वराज यांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर आहे. अनेक भागात पाणी....
अधिक वाचा