ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

१८६ विरूद्ध ७४ मतांनी 'तिहेरी तलाक' विधेयक लोकसभेत मांडण्यास मंजुरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 21, 2019 04:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

१८६ विरूद्ध ७४ मतांनी 'तिहेरी तलाक' विधेयक लोकसभेत मांडण्यास मंजुरी

शहर : देश

लोकसभा अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मांडण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. आवाजी मतदानानं विधेयक मांडण्यास मंजुरी दिल्यानंतर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत मतविभाजनाची मागणी केली. त्यानंतर या हे विधेयक मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी मतदान घेतलं. १८६ विरूद्ध ७४ मतांनी या ठरावाला मंजुरी देण्यात आली. या विधेयकावरून विरोधकांनी लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. तसंच हे विधेयक मूलभूत हक्कांचं हनन असून घटनाविरोधी असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

परंतु, या विधेयकाला विरोध करताना काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या विधेयकामुळे मुस्लीम महिलांच्या हितांचं रक्षण होणार नाही परंतु, त्यांच्या अडचणींत आणखी वाढ होईल, असा मुद्दा मांडला. थरुर यांच्यानंतर ओवैसी यांनीही या विधेयकाला आपला विरोध दर्शवला. या विधेयकात केवळ 'मुस्लीम' पुरुषांना शिक्षेची तरतूद करण्यात आलीय. सरकारला केवळ मुस्लीम महिलांचा पुळका का आहे? केरळच्या हिंदू महिलांची चिंता सरकार का करत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. सर्वोच्च न्यायालयानं केवळ 'तीन तलाक' असंविधानिक ठरवला आहे. परंतु या विधेयकानंतर ज्या महिलांचे पती तुरुंगात जातील त्यांच्या पत्नींचा खर्च उचलण्यासाठी सरकार तयार आहे का? असाही सवाल त्यांनी सरकारला केला.

जेडीयूचाही विरोध

केंद्रातील मोदी सरकारचा सहकारी पक्ष असलेल्या जेडीयूनंही तिहेरी तलाक विरोध विधेयकावर आपलं वेगळं म्हणणं मांडलंय. जेडीयूचे महासचिव के सी त्यागी यांच्या म्हणण्यानुसार, एनडीएमध्ये तिहेरी तलाक विधेयकाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. सध्या आपला पक्ष तीन तलाक विधेयकाचं समर्थ करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मागे

मुंबईकरांसाठी 'बेस्ट'ची खुशखबर, प्रवास होणार स्वस्त?
मुंबईकरांसाठी 'बेस्ट'ची खुशखबर, प्रवास होणार स्वस्त?

मुंबईत आता बेस्ट बसने फिरणं अति स्वस्त होण्याची शक्यता आहे. बेस्ट बसच्या सम....

अधिक वाचा

पुढे  

सर्वच विद्यार्थ्यांना आता ग्रेस गुणांचा लाभ : विद्यापीठाचा निर्णय
सर्वच विद्यार्थ्यांना आता ग्रेस गुणांचा लाभ : विद्यापीठाचा निर्णय

सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांची सवलत दे....

Read more