By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 02:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सिंधदुर्ग
कोल्हापूर येथून गोव्याच्या दिशेने जाणारा मालवाहक ट्रक (एमएच-09/सीयू-4646) सकाळी सातच्या सुमारास इन्सुली घाटीतील यू वळणावर चालकाचा ताबा सुटून 100 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात क्लिनर राकेश महादेव रोगी (20, रा. चिक्कोडी-बोरगोड, कर्नाटक) हा जागीच ठार झाला. तर ट्रकचालक बाजीराव नांगरे (रा. सावर्डे, राधानगरी-कोल्हापूर) याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले.
अपघाताच्या आवाजाने इन्सुली येथील उत्कर्ष युवक मंडळाचे कार्यकर्ते घटनास्थळी धावून आले. मृत राकेश हा ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. त्याला दीड तासाच्या अथक प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले. मात्र, त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताची भीषणता एवढी होती ट्रकची चेस एका बाजूला झाडाला लोंबकळत राहिली. तर हौदा एका बाजूला झाला.
मृत राकेश हा आठ दिवसांपूर्वीच अक्षय सुरेश पाटील (रा. कोल्हापूर) यांच्याकडे चालक म्हणून रुजू झाला होता. अपघाताची खबर मालक पाटील यांना तसेच नातेवाईकांना देण्यात आल्यावर ते तात्काळ इन्सुलीत दाखल झाले.
झाराप-पत्रादेवी बायपास झाल्यानंतर या मार्गाने अवजड वाहनांची वर्दळ कमी प्रमाणात होत होती. मात्र, चालक झोपेत असल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे. घाटीत अपघात झाल्यावर नेहमीच मदतीसाठी धावणाऱया उत्कर्ष युवक कला-क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदतकार्य केले. दीड तासाच्या अथक परिश्रमाने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
मुंबई - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या....
अधिक वाचा