ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ट्रम्प यांच्या शीरच्छेदासाठी 5.76 अब्जाचे इनाम 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ट्रम्प यांच्या शीरच्छेदासाठी 5.76 अब्जाचे इनाम 

शहर : देश

        अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचे ढग दाटले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीनंतर इराणनेही ट्रम्प यांच्या शीरच्छेदासाठी 8 कोटी डॉलर म्हणजेच 5.76 अब्ज रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.

 

         अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. चार दिवसांपूर्वीच अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला होता. त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यात इराकचा मेजर जनरल कासिम सुलेमानचा खात्मा झाला. तर शनिवारी सकाळी अमेरिकेने पुन्हा बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जळून मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ईराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबीचा मृत्यू झाला होता.

 

          त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा इराणने प्रतिहल्ला चढवत बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र तसेच मोर्टार डागले. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकमधील महत्त्वाच्या 52 ठिकाणांवर अमेरिकेचा निशाणा आहे. अमेरिकेच्या कोणत्याही ठिकाणावरचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही. असा हल्ला करणाऱ्याचा  शोधून खात्मा करु असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

 

          त्याला प्रत्युत्तर देत इराणने ट्रम्प यांचा शीरच्छेद  5.76 अब्ज रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. त्यासाठी इराणच्या सर्व नागरिकांनी प्रत्येकी एक डॉलर दान करावा. त्यातून उभी राहणारी 8 कोटी डॉलर इतकी रक्कम डोनाल्ड ट्रम्प यांचा शीरच्छेद करणाऱ्या व्यक्तीस दिली जाईल, असे इराणने स्पष्ट केले आहे.

मागे

ऑस्ट्रेलियात भीषण आग; ५० कोटी प्राण्यांचा होरपळून मृत्यू
ऑस्ट्रेलियात भीषण आग; ५० कोटी प्राण्यांचा होरपळून मृत्यू

        सिडनी - गतवर्षी अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीनंतर आता ऑस्ट....

अधिक वाचा

पुढे  

जेएनयू हिंसाचारप्रकरण: मुंबई, पुण्यात मध्यरात्री निदर्शने
जेएनयू हिंसाचारप्रकरण: मुंबई, पुण्यात मध्यरात्री निदर्शने

           नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेए....

Read more