By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2020 05:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कडक शिस्तीचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावर असणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली मुंबईत करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंना दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. असं असताना तातडीने त्यांची बदली करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांची बदली सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंच्या कामकाजावर नागपूर महापालिकेत सत्तेत असलेल्यया भाजपने तसंच काँग्रेसनेही नाराजी दर्शवली होती. नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी आणि या विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणाऱ्या आणि शासकीय यंत्रणेचा कारभार मोठ्या जबाबदारीनं सांभाळणाऱ्या पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द मुंढे यांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली. अशा परिस्थितीत तुकाराम मुंढेंची बदली केली आहे.
तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांना आपल्या पदाचा कार्यभार राधाकृष्णन यांच्याकडे सोपवून त्वरित नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आलं आहे
एशियन पेंटच्या एका जाहिरावरुन कोल्हापूरचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील आक....
अधिक वाचा