By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 07, 2020 09:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 1000 पेक्षा जास्त झाली आहे. दुसरीकडे मृतांचा आकडा देखील वाढत चालला आहे. आज (7 एप्रिल) नागपूरमध्ये देखील पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत कठोर नियमावली जारी केली आहे . तसेच कोरोनाग्रस्त मृतदेहांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी या मार्गदर्शक तत्त्वांचं कठोर पालन करण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले आहेत.
नागपूर शहरात कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. त्यामुळे या माध्यमातून संसर्गाचा धोका वाढला आहे. हा धोका लक्षात घेत नागपूर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाची पावलं उचलली आहेत. कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन व्हावं यासाठी पोलिस आयुक्तालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) प्रशासनाला देखील पत्र देण्यात आलं आहे.
कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्काराची नियमावली काय?
1. मृतदेहाला कुणीही स्पर्श करु नये.
2. मृतदेहावर अंत्यविधी करताना 5 पेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये.
3. संबंधित रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी.
4. मृतदेहाला कुणी स्पर्श करणार नाही आणि अंत्यविधीला पाचपेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत, याची खातरजमा झाल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करणे.
5. अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
राज्यात नव्याने वाढलेले रुग्ण कुठे किती?
मुंबई – 116
पुणे – 18
ठाणे – 2
अहमदनगर – 3
बुलडाणा – 2
नागपूर – 3
औरंगाबाद – 3
सांगली – 1
सातारा – 1
रत्नागिरी – 1
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1018 वर पोहोचली आहे. यात मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद आहे. तर दुसऱ्या क्रमाकांवर पुण्याचा क्रमांक लागतो आहे. यापाठोपाठ अहमदनगर आणि सांगलीचा क्रमांक आहे
आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत, देशभरात मागील २४ तासात कोविड-19 (COVID-19) मु....
अधिक वाचा