ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नागपूरमधील खासगी रुग्णालयांवर पालिकेचा वॉच, तुकाराम मुंढेंकडून विशेष पथकाचं गठन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 04, 2020 12:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नागपूरमधील खासगी रुग्णालयांवर पालिकेचा वॉच, तुकाराम मुंढेंकडून विशेष पथकाचं गठन

शहर : नागपूर

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठन केलं आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

नागपूरमधील खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर हे विषेश पथक लक्ष ठेवणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानं हे विषेश पथक गठन करण्यात आलं. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लागणार असल्याचं दिसत आहे. मनपाचं हे विशेष पथक रुग्णालयांची अचानकपणे पाहणी करणार आहे. तसेच काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाईचा बडगाही उगारणार आहे.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांमध्ये 80 टक्के बेड राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, काही रुग्णालयांकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काही खासगी रुग्णालयं तर अतिरिक्त शुल्क आकारत असल्याच्याही तक्रारी देखील नागरिक करत आहेत. अशा रुग्णालयांवर महानगरपालिकेकडून कारवाई होणार आहे.

तुकाराम मुंढे यांनी नागपूरमध्ये जी रुग्णालयं अतिरिक्त शुल्क आकारतील त्यांची तक्रार करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. या तक्रारींची त्वरीत दखल घेत अशा मुजोर रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

नागपूरकरांना पाणी दरवाढीपासून काही काळ दिलासा

नागपूरकरांना पाणी दरवाढीपासून काही काळ दिलासा मिळाला आहे. नागपुरातील पाणी दरवाढीच्या प्रस्तावाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. स्थायी समितीनं याबाबतचा प्रस्ताव जलप्रदा समितीकडे परत पाठवला आहे. कोरोनाच्या संकटकाळात पाणीदरवाढ नको म्हणून हा प्रस्ताव परत पाठवल्याचं सांगितलं जात आहे.जलप्रदा विभागाचा 5 टक्के पाणी दरवाढीचा प्रस्ताव होता. सभागृहाच्या मंजुरीनंतरच यावर निर्णय होणार आहे.

 

मागे

श्री राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम : १७५ मान्यवरांना निमंत्रण, नेपाळमधील संत सुद्धा येणार
श्री राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम : १७५ मान्यवरांना निमंत्रण, नेपाळमधील संत सुद्धा येणार

अयोध्येत (Ayodhya) श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन कार्यक्रमासाठी १७५ मान....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत सरसकट दुकानं सुरु कण्यास परवानगी, दारु दुकानांना काऊंटरवर विक्रीला मुभा
मुंबईत सरसकट दुकानं सुरु कण्यास परवानगी, दारु दुकानांना काऊंटरवर विक्रीला मुभा

मिशन बिगीन अंतर्गत मुंबईत आता सरसकट दुकानं सुरु कण्याची परवानगी मुंबई महाप....

Read more