By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 14, 2021 11:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या चाहत्यांची ही मन दुखावणारी बातमी आहे. तुकाराम मुंढे यांची ५ महिन्यापूर्वी नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावरुन, मुंबईत महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी बदली झाली होती. आता तुकाराम मुंढे यांची बदली सरकारने राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी केली आहे. तुकाराम मुंढे यांची फार कमी काळात ही बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांच्या चाहत्यांनी, वाघ तो वाघच असतो, कुठेही टाका, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बदलीवर दिल्या आहेत. एकंदरीत तुकाराम मुंढे यांच्या बदलीची यादी वाढत चालली आहे.
तुकाराम मुंढे यांनी नागपूर शहरात कोरोना दरम्यान कठोर शिस्त दाखवून दिली होती, याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
नागपूर महापालिकेत आयुक्तपदी कार्यरत असताना ते सत्ताधारी भाजपविरुद्ध प्रशासन अशा वादात सापडले होते. त्यानंतर त्यांची काही महिन्यापूर्वी नागपूरच्या आयुक्तपदावरुन त्यांची बदली झाली होती. त्यांची बदली जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी झाली होती, आता तेथून त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे, आज राज्य सरकारने त्यांच्याकडे राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदाची जबाबदारी दिली आहे.
तुकाराम मुंढे यांचा मोठा चाहता वर्ग सोशल मीडियावर आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या धडाडीच्या अधिकाऱ्यांच्या जेव्हा सतत बदल्या होतात, तेव्हा हा चाहता वर्ग नक्कीच नाराज होतो. कोणतेही सरकार आले तरी तुकाराम मुंढे यांची बदली होतेच हे मात्र नक्की.
मागील काही दिवसांपासून सुरु असलेला भारत (India) आणि चीनमधील (China) सीमावाद अजूनही स....
अधिक वाचा