ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लासलगावात दाखल, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2020 06:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लासलगावात दाखल, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

शहर : नाशिक

आशिया खंडातील अग्रसर कांद्याची दुसऱ्या क्रमांकावर असलेली बाजारपेठ पिंपळगाव बसवंत इथं तुर्कस्तानचा 100 टन तर 10 टन इजिप्तचा कांदा दाखल झाला आहे. तुर्कस्तानचा कांदा दाखल झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना स्थानिक कांदा न देण्याचा निर्णय घेत बहिष्कार घालण्यात आला आहे. तसंच केंद्र सरकारने आठ दिवसात कांदा आयात न थांबवल्यास थेट तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला आहे.

अतिवृष्टीमुळे चाळीत साठवलेल्या कांदा सडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अशात नवीन लाल कांद्याचं पीक वाया गेल्याने कांद्याचे बाजार भाव 8 हजार रुपयांवर गेले. केंद्र सरकारच्यावतीने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्त, इराण, इराक, तुर्कीस्तान इथून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिल्याने नाशिकच्या पिंपळगाव बसवंत इथल्या एका आयातदार कांदा व्यापाऱ्याने शंभर टन कांदा आयात केला आहे.

 

या कांद्याचा उग्र वास येत असून प्रतवारी ही खालवली असल्याचे व्यापारी सांगत आहे. यामुळे स्थानिक कांद्याच्या बाजार भावावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे व्यापारी सांगत असले तरी सात दिवसात कांदा दाखल होण्याअगोदर 2200 रुपये प्रतिक्विंटल मागे बाजार भाव कोसळला अशी माहिती आयातदार कांदा व्यापारी सुजित दायमा यांनी दिली.

                        

आज पिंपळगाव बसवंत इथं तुर्कस्तानचा 100 टन तर इजिप्तचा 10 टन कांदा दाखल झाल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली आहे. व्यापाऱ्यांनी परदेशातील कांदा आयात करू नये आणि स्थानिक कांद्याला देशांतर्गत पाठवण्यासाठी खरेदी करण्याचे आव्हान केलं आहे. आयात करणाऱ्या कांदा व्यापार्‍याला एकही कांदा न देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आठ दिवसात कांदा आयात न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला.

मागे

Arnab Goswami | अर्णव गोस्वामींचा जेलमधील मुक्काम वाढला, हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाहीच
Arnab Goswami | अर्णव गोस्वामींचा जेलमधील मुक्काम वाढला, हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाहीच

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना मोठा झटका मिळाला आहे. मुंबई ....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये बदल
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये बदल

दिवाळी जवळ आली की, दरवर्षीच फटाक्यांच्या दु्ष्परिणामांची चर्चा होते. फटाक्....

Read more