ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोकणवासीयांना खुशखबर ! तुतारी पळणार या वेळेत

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 22, 2019 04:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोकणवासीयांना खुशखबर ! तुतारी पळणार या वेळेत

शहर : मुंबई

कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी तुतारी एक्सप्रेसच्या वेळेत 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीसाठी बदल करण्यात आला आहे. दादर-सावंतवाडी रोड-दादर मार्गे जाणारी रेल्वे म्हणजेच तुतारी एक्सप्रेस दादर स्थानकातून रोज रात्री 11.45 वाजता सुटते ती 12.10 वाजता सुटणार आहे. या गाडीला गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तुतारी एक्स्प्रेसला टू टायर एसीचा 1, थ्रि टायर एसीचा 1, स्लीपर क्लास चे 7, जनरल क्लास चे 8 तर सेकंड क्लास चे 2 असे एकूण 19 कोच असणार आहेत. त्यामुळे कोकणात जाणार्‍या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सव काळात ही गाडी दादर स्थांनाकाच्या फलाट क्रमांक 5 वरुन रात्री 12.10 वाजता सुटेल. ती सावंतवाडी रोड स्थानकात दुपारी 12.25 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सायंकाळी 6.30 वाजता दादर स्थानकात फलाट क्रमांक 5 वर दाखल होईल.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांचा विचारकरून कोकण रेल्वेने आणखी 6 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे आणि सावंतवाडी रोड या स्थांनकांसाठी विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांना रोहा, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.

पुणे-सावंतवाडी रोड-एलटीटी ही गाडी 29 ऑगस्टला पुण्याहून रात्री 12.10 वाजता सुटणार असून एलटीटीला दुपारी 4.50 वाजता पोहोचणार आहे. पनवेल सावंतवाडी रोड- पुणे (2 फेर्‍या) ही गाडी 31 ऑगस्ट ला पनवेल हून मध्यरात्री 12.55 वाजता सुटणार असून दुपारी 2.10 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे.

मागे

रेल्वे कर्मचार्‍यांना मिळणार एक समान वेतन
रेल्वे कर्मचार्‍यांना मिळणार एक समान वेतन

रेल्वे कर्मचार्‍यासाठी लवकरच 7 वा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्यामु....

अधिक वाचा

पुढे  

हीरे उद्योगातही मंदीमुळे 15 हजार कारागीर बेरोजगार
हीरे उद्योगातही मंदीमुळे 15 हजार कारागीर बेरोजगार

हीर्‍यांची नगरी म्हणून ओळख असलेल्या गुजरातमधील सूरतलाही मंदीची झळ बसू ला....

Read more