By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 02, 2019 11:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत कालपासूनच मुसळधार सुरु आहे. नागरिकांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. पण या पावसात होणाऱ्या दुर्घटनांच्या संख्येत प्रत्येक मिनिटाला वाढच होताना दिसत आहे. या मुसळधार पावसाने मालाडमध्ये दोघांचा बळी घेतला आहे. मालाडच्या सबवेमध्ये पावसामुळे गाडीत गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला आहे.
मालाडच्या सबवेमध्ये पाणी भरले होते. याठिकाणी जाऊ नका अशी सुचना देण्यात आली होती. तरीही नागरिक या रस्त्याने जात होते. तसेच वाहन चालक देखील आपली वाहने या रस्त्यावरुन नेत होते. पण पाऊस न थांबल्याने गाडी सबवे मध्ये अडकून राहीली. बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने आतील दोघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची माहीती समोर येत आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई करणाऱ्या पावसाने रात्रभर बसरत आ....
अधिक वाचा