ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘सीएमई’मध्ये सरावादरम्यान दोन जवानांचा मृत्यू, पाच जखमी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 07:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘सीएमई’मध्ये सरावादरम्यान दोन जवानांचा मृत्यू, पाच जखमी

शहर : पुणे

    पुण्यातील दोपोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) पूल बांधणीच्या सरावादरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खडकी येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये जेसीओ दर्जाच्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

        मृत जवानांपैकी केरळचे रहिवासी असलेले संजीवन पी. के. असे एका जवानाचे नाव असून दुसऱ्या जवानाचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. केबल्सच्या सहाय्याने दोन टॉवरदरम्यान उभारण्यात आलेला पूल उघडण्याच्या प्रशिक्षणादरम्यान एक टॉवर अचानक कोसळला. या भीषण अपघातात टॉवरखाली नऊ सैनिक अडकून पडले यांपैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, असे जागरण या न्यूज पोर्टलने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

         युद्ध काळात लष्कराला मार्ग तयार करुन देण्यासाठी पूल उभारणे आणि इतर अभियांत्रिकीची कामे सीएमईतून जवानांना शिकवली जातात. यासाठी दररोजचा सराव कार्यक्रमही तयार करण्यात आलेला असतो. अशाच एका सरावादरम्यान गुरुवारी ही दुर्घटना घडली.

Recommended Articles

मागे

भारतीय रेल्वेसाठी आर्थिक वर्ष २०१८ -२०१९ इतिहासात जमा, तुम्हीच पहा का ते...
भारतीय रेल्वेसाठी आर्थिक वर्ष २०१८ -२०१९ इतिहासात जमा, तुम्हीच पहा का ते...

          नवी दिल्ली - भारतीय रेल्वेसाठी आर्थिक वर्ष २०१८-२०१९ आतापर्यं�....

अधिक वाचा

पुढे  

नववर्षात रेल्वे तिकीट दरवाढ होणार?
नववर्षात रेल्वे तिकीट दरवाढ होणार?

          नवी दिल्ली - भारतीय रेल्वेच्या सर्व तिकीट दरांच्या किमतीत वा....

Read more