By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 01:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
नौशेरा - संपूर्ण देशात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत सुरू असताना सीमेवर मात्र देशाच्या रक्षणासाठी दोन जवानांनी बलिदान दिले आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अचानक हल्ला चढवला. यात दोन जवान शहीद झाले. यानंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. शोधमोहीम सुरू असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्याचे काम सुरू आहे.
नौशेरा सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराच्या हाती लागली. त्यानंतर लष्करी जवानांनी सेक्टरमध्ये शोधमोहीम सुरू केली. त्याच वेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी दोन जवानांवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. या वेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये सन २०१९ मध्ये १६० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर १०२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी माहिती देताना सांगितले. दहशतवादी संघटनांमध्ये जाणाऱ्या स्थानिक युवकांच्या संख्येतही घट झाल्याचे सिंह म्हणाले.
नवी दिल्ली - किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेल्या विजय मल्ल्य....
अधिक वाचा