By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 12:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 48 वर पोहोचला आहे. मुंबईतील दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज सकाळी समोर आली. त्यानंतर आता नगर जिल्ह्यातील नेवासामधील एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा व्यक्ती दुबईवरुन आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोनवर पोहोचली आहे.
दरम्यान, मुंबई आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील 22 वर्षीय महिला इंग्लंडवरुन परतली आहे. तिला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. तर उल्हासनगरमधील 49 वर्षीय महिला दुबईवरुन आली असून, तिला सुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे.
त्याआधी काल रत्नागिरीत नवा कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. पुणे, मुंबई, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, कल्याण या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नुकतंच रत्नागिरीत कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर पोहोचली होती. त्यामध्ये आणखी दोन महिलांची वाढ झाल्याने हा आकडा 47 वर पोहोचला. दुबईतून रत्नागिरीत आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. कोकणातील हा रुग्ण 50 वर्षाचा आहे. त्यामुळे कोरोनाने कोकणातही शिरकाव केला आहे.
दुबईहून रत्नागिरीला परत आलेल्या एका प्रौढ व्यक्तीला ‘कोरोना’ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णाचा अहवाल बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता रत्नागिरीत थडकला आणि आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली. विमानतळावर तपासणी झाली त्यावेळी तो ‘कोरोना’ग्रस्त नसल्याचा अहवाल देण्यात आला होता, ही बाबच चिंताजनक ठरत आहे.
संबंधित रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी भागातील आहे. ते दुबईमध्ये नोकरी करतात. ‘कोरोना’च्या थैमानामुळे ते दुबईहून परत आले. विमानतळावर त्यांची तपासणी झाली, मात्र ते कोरोनाग्रस्त नसल्याचा अहवाल देण्यात आला. तिथून ते शृंगारतळीला आले.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
पिंपरी चिंचवड – 11
पुणे – 8
मुंबई – 9
नागपूर – 4
यवतमाळ – 3
कल्याण – 3
नवी मुंबई – 3
रायगड – 1
ठाणे -1
अहमदनगर – 2
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
उल्हासनगर – 1
एकूण 47
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
नागपूर (1) – 12 मार्च
पुणे (1) – 12 मार्च
पुणे (3) – 12 मार्च
ठाणे (1) – 12 मार्च
मुंबई (1) – 12 मार्च
नागपूर (2) – 13 मार्च
पुणे (1) – 13 मार्च
अहमदनगर (1) – 13 मार्च
मुंबईत (1) – 13 मार्च
नागपूर (1) – 14 मार्च
यवतमाळ (2) – 14 मार्च
मुंबई (1) – 14 मार्च
वाशी (1) – 14 मार्च
पनवेल (1) – 14 मार्च
कल्याण (1) – 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
औरंगाबाद (1) – 15 मार्च
पुणे (1) – 15 मार्च
मुंबई (3) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
यवतमाळ (1) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
मुंबई (1) – 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
पुणे (1) – 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 18 मार्च
रत्नागिरी (1) – 18 मार्च
मुंबई महिला (1) – 19 मार्च
उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
अहमदनगर (1) – 19 मार्च
एकूण – 48 कोरोनाबाधित रुग्ण
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून गर्दीची ठिकाणं बंद करण्या....
अधिक वाचा