By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, अनेकांना याचं गांभीर्यच नसल्याचं दिसत आहे. कारण हातावर विलगीकरण अर्थात ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के असूनही अनेकजण रेल्वेने प्रवास करत असल्याचं दिसत आहे. धक्कादायक म्हणजे आज सकाळीच दुबईवरुन मुंबईला आलेल्या दोघांनी रेल्वेने प्रवास केल्याचं समोर आलं.
मुंबईवरुन गुजरातकडे जाणाऱ्या दोघांना विरार स्टेशनवर उतरवण्यात आलं. एक पुरुष आणि एका महिलेचा यामध्ये समावेश आहे. हे दोघेही आज सकाळी दुबईवरुन मुंबईत आले होते. हे दोघेही रेल्वेने गुजरातला जात होते.
ही महिला रिझर्वेशन डब्यात तर पुरुष जनरल डब्यातून प्रवास करत होता. या दोघांच्या हातावरील स्टॅम्प लक्षात आल्यावर अन्य प्रवाशांनी चेन खेचून त्यांना विरार स्टेशनवर उतरवलं आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन, त्यांचं स्क्रीनिंग करण्यात आलं. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येत आहे.
जगभरात कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला आहे. देशासह मुंबई आणि महाराष्ट्रातह....
अधिक वाचा