ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दोन टीसींना प्रवाशांकडून बेदम मारहाण

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दोन टीसींना प्रवाशांकडून बेदम मारहाण

शहर : मुंबई

          मुंबई - एकाच दिवशी रेल्वेच्या तिकिट दोन तपासनिकांना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानक आणि हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल या स्टेशनवर या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. अनधिकृतरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ही मारहाण करण्यात आलीय. दोन्ही घटनेत प्रवाशांकडे तिकीट नव्हते. त्यांना हटकल्याने या प्रवाशांनी उलट तिकीट तपासनिकांना मारहाण केली. या बाबतची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आलीय.


         मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेवर वांद्रे स्थानकात तिकीट तपासनीस विवेक रॉय आपले कर्तव्य बजावित होते. सकाळी ११.२० च्या सुमारास एक प्रवासी विनातिकिट प्रवास करून वांद्रे स्थानकात फलाट क्रमांक १ वर उतरला. त्यावेळी त्याच्याकडे तिकिटाची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची कारणे दिली... आणि या प्रवाशाकडून रॉय यांना रेल्वे रुळावर फेकण्यात आलं. या घटनेमध्ये रॉय यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. याबाबतची तक्रार वांद्रे पोलिसांकडे नोंदविण्यात आलीय.


          दुसऱ्या घटनेत, मंगळवारी दुपारी हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकातून आरोपी तौफीक कुरेशी आणि अन्सारी प्रवास करत होते. दुपारी ४.३० च्या सुमारास किंग्ज सर्कल स्थानकात हे दोघे उतरले. स्थानकातून जात असताना तिकीट तपासनीस हरेराम शर्मा यांनी तिकीटची विचारणा केली. मात्र या दोघांनी शर्मा यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. नियमानुसार शर्मा यांनी या दोघांना दंड भरण्यास सांगितले.


         मात्र या दोघांनी शर्मा यांना बेदम मारहाण केली आणि त्यांना रेल्वे रुळावर ढकलून दिलं. या मारहाणीत शर्मा यांच्या हाताला आणि पाठिला जबर मार लागला आहे. शर्मा यांच्यावर भायखळा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी पकडले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

मागे

कोण होणार भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'?
कोण होणार भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'?

         नवी दिल्ली - भारताच्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (Chief of Defence Staff) पदासा....

अधिक वाचा

पुढे  

खर्च परवडत नसल्यानं बँकांच्या एटीएमची संख्या निम्म्यावर
खर्च परवडत नसल्यानं बँकांच्या एटीएमची संख्या निम्म्यावर

           औरंगाबाद - पैसे काढण्यासाठी तुम्ही आम्ही सर्रास एटीएमचाच वा....

Read more