By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 23, 2019 12:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
जम्मू-काश्मीरच्या शोपियान सेक्टरमध्ये रविवारी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत चार दहशतवादी ठार झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, येथील दारूमरोडा कीगम परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी या परिसरात घेराव घातला. काही वेळानंतर दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसमाने आले आणि चकमकीला सुरुवात झाली. यामध्ये भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
तसेच भारतीय लष्कराने या दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठाही जप्त केला आहे. याठिकाणी अजूनही काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असून शोध मोहीम सुरु आहे.
काश्मीरमध्ये शुक्रवारपासून सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक पाहायला मिळत आहे. शनिवारी बारामुला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ‘जैश ए मोहम्मद’चा दहशतवादी ठार झाला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात करतारपूर कॉरिडोअरवरून वाद निर्माण होण्याची श....
अधिक वाचा