ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Jammu and Kashmir : कुलगाम भागात भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 10, 2020 10:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Jammu and Kashmir : कुलगाम भागात भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शहर : देश

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या काही भागात सुरक्षाबलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी घडत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील येरीपोरा भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षाबलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटवता आलेली नाही. तसेच ते कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते, याबाबतची माहितीदेखील अद्याप मिळालेली नाही.

पोलिस आणि सुरक्षाबलाच्या जवानांनी संयुक्तपणे मध्यरात्रीपासून कुलगाम भागात सर्च ऑपरेशन सुरु केले होते. त्यानंतर येरीपोरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात दोन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले. दहशतवाद्यांकडील एक एम 4 रायफल आणि पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. जे दोन दहशतवादी मारले गेले आहेत, त्यापैकी एकजण पाकिस्तानी असल्याची माहिती मिळाली आहे.

शोपियान भागात दोन दहशतवादी ठार

दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील शोपियान (Shopian) परिसरात सुरक्षा बलाचे (Security Forces) जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु होत्या. त्यामधील सुगन भागात झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

07 ऑक्टोबरला सकाळी सुरक्षाबल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका विशेष सुचनेच्या आधारे सुगन भागात शोधमोहीम राबवली होती. त्यावेळी जवानांना दहशतवादी लपलेल्या जागेची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांचा अड्डा घेरला. बाहेर पोलीस आणि जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. जवानांनीदेखील त्यास प्रत्युत्तर दिले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

पुलवामात दोन दहशतवादी ठार

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अंवतीपोरा भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले होते. सुरक्षा बलाच्या जवानांना माहिती मिळाली होती की, येथील सम्बोरा क्षेत्रात दहशतवादी लपले आहेत. त्यानंतर जवानांनी त्या भागात सर्च ऑपरेशन राबवले. याचदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. तेव्हा झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

मागे

रामविलास पासवान यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
रामविलास पासवान यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई पोलिसांनी हात आखडले, TRP घोटाळ्याचा तपास खास यंत्रणेकडे
मुंबई पोलिसांनी हात आखडले, TRP घोटाळ्याचा तपास खास यंत्रणेकडे

गेल्या काही दिवसांपासून चॅनेलच्या टीआरपीचा विषय चर्चिला जात आहे. टेलिव्हि....

Read more