By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 15, 2019 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. खासदार उदयनराजे भोसले आणि सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादाबाबत मुंबईत पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही नेत उपस्थित होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही बैठकीला उपस्थित होते. पवार यांनी बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली.
खासदार उदयनराजे भोसले आणि सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद जोरदार उफाळला. शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतरही उदयनराजे आणि निंबाळकर यांच्यातील वाद कायम राहिला. उदयनराजे हे बैठक अर्धवट सोडून निघून गेले. त्यामुळे या वादावर तोडगा कसा काढायचा, असा पेच राष्ट्रवादीसमोर उभा राहिला आहे. वादाबाबत मुंबईत पक्ष कार्यालयाबाहेर मीडियाशी बोलताना उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेले होते. मी मोठ्या माणसांचा मान राखला आहे. माझ्या वयाचे असते तर त्यांना मी चांगल्याच भाषेत सांगितले असते. माझेच अन्य पक्षांत मित्र नाहीत तर शरद पवार, अजित पवार यांचेही मित्र आहेत. त्यामुळे यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे, असे उदयनराजे म्हणालेत.साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची मुंबईत बैठक पार पडली. नीरा देवघरच्या पाण्यावरून सातारा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार वाद पेटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीनंतर उदयनराजेंचा रुद्रावतार पाहायला मिळाला. त्यामुळे पवारांची मध्यस्थी निष्फळ ठरल्याचे बोलले जाते आहे.
खासदार उदयनराजेंनी केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. उदयनराजेंना आवरा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याची परवानगी द्या, असा निर्वाणीचा इशारा रामराजे यांनी शरद पवार यांना दिला होता. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांवरही त्यांनी जहरी टीका केली.
बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात मेंदूज्वरानं थैमान घातलेलं दिसतंय. शुक्रव....
अधिक वाचा