ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ठाकरे सरकारचा सम्राट अशोक कालीन गुंफेचा बिल्डरांशी सौदा करण्याचा घाट: सोमय्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 03, 2021 12:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाकरे सरकारचा सम्राट अशोक कालीन गुंफेचा बिल्डरांशी सौदा करण्याचा घाट: सोमय्या

शहर : मुंबई

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारविरोधात आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. ठाकरे सरकारने अंधेरी येथील सम्राट अशोक कालीन महाकाली गुंफा बिल्डराच्या घशात घालण्याचा घाट घातल्याचा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच ही गुंफा बिल्डरांच्या घशात घातल्यास त्याविरोधात जोरदार आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज अंधेरी येथील सम्राट अशोक कालीन प्राचीन महाकाली गुंफेची पाहणी करून दर्शन घेतलं. यावेळी सोमय्या यांनी ठाकरे सरकार ही गुंफा बिल्डरांच्या घशात घालत असल्याचा आरोप केला आहे. आम्ही आज महाकाली गुंफेची पाहणी केली. ही अति प्राचीन गुंफा आहे. सम्राट अशोकाच्या काळातील ही गुंफा आहे. मात्र ठाकरे सरकार शाहिद बलवा आणि अविनाश भोसले या दोन बिल्डरांशी या पवित्र जमिनीचा सौदा करायला निघाले आहेत. आम्ही हे कदापिही होऊ देणार नाही. ही जमीन बिल्डराच्या घशात जाऊ देणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

फडणवीसांनी प्रस्ताव नाकारला होता

महाकाली गुंफा आणि रस्त्यांचा टीडीआर मिळावा म्हणून 26 नोव्हेंबरला ठाकरे सरकारने विशेष जीआर काढला. डिसेंबरमध्ये ऑर्डर सही केली आणि रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. पण देवेंद्र फडणवीस सरकार यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. तरी उद्धव ठाकरे सरकारने तो कसा पास केला. मुंबई महानगरपालिका आयुक्त खोटारडे आहेत. इक्बाल चहल यांची या प्रकरणात हकालपट्टी झाली पाहिजे, असं टीकास्त्र सोमय्यांनी सोडलंय.

गुंफा वाचवण्यासाठी केंद्राशी बोलू

महाकाली गुफा व मंदिराचा सुमारे २०० कोटींचा टीडीआर अनधिकृतपणे बिल्डर अविनाश भोसले, शाहीद बालवा यांच्या कंपनीला मुंबई महापालिका व राज्य सरकारने देण्याचा निर्धार केला आहे. पुरातन विभागाची परवानगी न घेता ही प्रक्रिया करण्यात आली आहे. ऐतिहासिक वास्तू आणि देव-देवळांचा शिवसेनेला विसर पडलाय. महाविकास आघाडीत गेल्यावर शिवसेनेने विचारधारा बदलली. ठाकरे सरकारनं बिल्डरच्या बाजूनं हा निर्णय दिलेला असून, मुंबईकरांशी गद्दारी केलीय. सरकारचं एकही षडयंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.याबाबत केंद्राशी आम्ही बोलणार आहोत. कोर्टाच्या ऑर्डरची ठाकरे सरकार किंमत करत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

 

मागे

Corona Vaccine | कोरोना वॅक्सीनवरही ‘हराम’चा वाद, काय म्हणतायत मुस्लिम देश?
Corona Vaccine | कोरोना वॅक्सीनवरही ‘हराम’चा वाद, काय म्हणतायत मुस्लिम देश?

कोरोनावरील लस लवकरच सामान्य भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहे (Haram Corona Vaccine). लसीकरण....

अधिक वाचा

पुढे  

सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी
सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे.  ....

Read more