ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात पारदर्शकता ठेवा, मुख्यमंत्र्यांच्या पोलिस महासंचालकांना सूचना

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 03, 2020 01:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात पारदर्शकता ठेवा, मुख्यमंत्र्यांच्या पोलिस महासंचालकांना सूचना

शहर : मुंबई

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासामध्ये पारदर्शकता ठेवा, चोख तपास करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारीवर्षाबंगल्यावर पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त आणि मुख्य सचिव यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची व्यवस्था, पाच ऑगस्टपासून मॉल तसेच इतर काही गोष्टी सुरु करण्याबाबतचा आढावा घेतला. शासकीय निवासस्थानवर्षावर झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा आढावा घेताना तपासामध्ये पारदर्शकता ठेवण्याबरोबरच चोख तपास करण्याच्या सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्याचे समजते.सुशांतसिंह प्रकरणावरुन राजकारण तापले असून बिहार सरकारने महाराष्ट्रातील पोलिसांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. याशिवाय सुशांतसिंहच्या घरी झालेल्या कथित पार्टीत राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्रीही सहभागी असल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप होत आहे. पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांनी बीएमसीने जाणूनबुजून क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हिडीओ ट्वीटद्वारे केला आहे.

चाकरमान्यांच्या प्रश्नावरही उद्धव ठाकरेंची चर्चा

दरम्यान, गणेशोत्सविनिमित्त मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात जात असल्याने त्यांच्या -पासची व्यवस्था, वाहतुकीची व्यवस्था याचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला. राज्य सरकारचा पाच ऑगस्टपासून मॉल सुरु करण्याचा विचार असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

मागे

राममंदिर भूमिपूजन: कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका आली समोर, हे असतील प्रमुख पाहुणे
राममंदिर भूमिपूजन: कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका आली समोर, हे असतील प्रमुख पाहुणे

अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाच्य....

अधिक वाचा

पुढे  

कोकणसह मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, दुपारी हाय टाईडचा इशारा; रेड अलर्ट जारी
कोकणसह मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, दुपारी हाय टाईडचा इशारा; रेड अलर्ट जारी

कोकणसह मुंबईत रात्रीपासून जोरदाप पाऊस कोसळत आहे. पावसाने (Rain) मुंबईचे (Mumbai) हाल....

Read more