By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 11:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
तेहरान - इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचे बोईंग 737 हे विमान कोसळले आहे. या विमानातून 180 प्रवाशी प्रवास करत होते. या अपघात सर्व प्रवासी ठार झाल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे.
युक्रेन एअरलाइन्सचे बोईंग ७३७ या विमानाने तेहरान विमानतळावरून उड्डाण घेतले. अवघ्या काही वेळेतच विमान कोसळले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. अपघातग्रस्त विमान हे युक्रेनची राजधानी कीव येथे जात होते.
दरम्यान, या भीषण अपघातातील विमानात १८० प्रवाशांपैकी एकही प्रवासी बचावला नाही. आज झालेल्या अपघातानंतर 'बोईंग ७३७' च्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई - गेट-वे ऑफ इंडियाजवळच्या आंदोलनातलं फ्री काश्मीरचं पोस्टर....
अधिक वाचा