By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 06:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उल्हासनगरमधील कॅम्प तीन मधील ''महक अपार्टमेंट' ही 5 मजली इमारत आज सकाळी 10 च्या सुमारास पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली. मात्र ही इमारत आधीच खाली करण्यात आल्याने 100 जणांचे प्राण सुदैवाने वाचले.
या 5 मजली इमारतीत 31 फ्लॅट होते. त्यामध्ये 100 जण राहत होते. या इमारतीला तडे गेल्याचे रहिवाशांच्या निदर्शनाला येताच त्यांनी तात्काळ याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. महापालिकेने अधिकारीही दाखल झाले होते. त्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारतीमधील सर्व 100 रहिवाशांना स्थलांतरित करून ती सील केली. आज ही इमारत कोसळली.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोपाखाली अटकेत असलेले प्रसिद्ध व्यावसा....
अधिक वाचा