ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षांनी वाहिली सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 02:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षांनी वाहिली सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली

शहर : विदेश

संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्ष मारिया फर्नाडा एस्पिनोसा यांनी भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रशंसा करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. सुषमा स्वराज या असाधारण महिला आणि नेत्या होत्या असं त्यांनी म्हटलं. सध्या ब्रिटेन दौऱ्यावर असलेल्या एस्पिसोना यांनी ट्विट करत म्हटलं की, 'आपलं जीवन जनसेवेसाठी समर्पित करणारी असाधारण महिला आणि नेता सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या बातमीने खूप दु: झालं.'

सुषमा स्वराज यांचं मंगळवारी दिल्लीत निधन झालं. एस्पिसोना यांनी म्हटलं की, 'भारत दौऱ्यावर असताना मला त्यांना भेटण्याचा सन्मान मिळाला. मी त्यांना स्नेहासह नेहमी आठवणीत ठेवेल.

अफगाणिस्तानच्या अमेरिका मिशनने देखील ट्विट करत सुषमा स्वराज यांच्या निधनावर अफगाणिस्तानच्या जनतेकडून भारत सरकार आणि भारतीय जनतेच्या प्रति संवेदना व्यक्त केली.

ग्लोबल ऑर्गेनाइजेशन ऑफ पीपुल ऑफ इंडियन ऑरिजिन (गोपियो) ने म्हटलं की, "त्यांच्या निधनाने आम्हाला एक राजकारणीसह ईमानदार आणि सक्षम नेता गमवल्याची भावना जाणवत आहे.

गोपियोने पुढे म्हटलं की, 'संघटनेने त्यांच्यासोबत काम केलं. परदेशात राहणाऱ्या भारतीय आणि भारतीय वंशांच्या व्यक्तींशी संबंधित अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांची मदत मिळाली.'

हिंदू अमेरिकन फाउंडेशनचे डायरेक्टर ऑफ गवर्नमेंट रिलेशन्स जय कंसारा यांनी म्हटलं की, स्वराज यांनी क्षेत्र (अमेरिका) आणि जगभरात हिंदू अल्पसंख्यकांची काळजी घेतली. "त्यांनी प्रत्येक समस्या सोडवली. त्या एखाद्या आई प्रमाणे समस्या सोडवत होत्या.'

Recommended Articles

मागे

राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर,वैद्यकीय महाविद्यालयातील रूग्णसेवेवर  परिणाम
राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर,वैद्यकीय महाविद्यालयातील रूग्णसेवेवर परिणाम

राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्व शासकीय वै....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या स्मारकासाठी आणखीन एक भूखंड मिळणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या स्मारकासाठी आणखीन एक भूखंड मिळणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आधीच शिवाजी ....

Read more