ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या लोटेतील मालमत्तेचा 1 डिसेंबरला लिलाव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2020 10:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या लोटेतील मालमत्तेचा 1 डिसेंबरला लिलाव

शहर : रत्नागिरी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या लोटे येथील मालमत्तेच्या लिलावाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असून, उद्या (1 डिसेंबरला) मुंबईत जागेचा लिलाव केला जाणार आहे. लोटे इथल्या जागेची किंमत 1 कोटी 9 लाखांच्या घरात निश्चित करण्यात आली आहे. स्लगलिंग आणि फॉरेन एक्सचेंज मँनिप्युलेट आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या जागेची पाहणी केली होती.

10 नोव्हेंबरच्या लिलाव प्रक्रियेत दाऊदच्या सात पैकी सहा जागांचा लिलाव झाला होता. लोटेतील मालमत्तेचा लिलाव मागे घेण्यात आला होता. मागे घेण्यात आलेल्या जागेचा आता 1 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. आधीच्या जागांच्या लिलावात मालमत्तेची खरेदी केलेले सुप्रीम कोर्टाचे वकील भुपेंद्रकुमार भारद्वाज यांनीसुद्धा या जागेची पाहणी केली होती. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आता मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे.

तत्पूर्वी दिल्लीच्या दोन वकिलांनी दाऊदच्या सहा मालमत्ता घेतल्या होत्या. यामधून सरकारला 22 लाख 79 हजार 600 रुपये मिळाले आहेत. वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी सहा मालमत्ता घेतल्या होत्या.  तर दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या 11 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आली होती. सेफमा अर्थात स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव झाला होता.

 

नरिमन पॉईंट येथील सफेमा कार्यालयात दाऊदच्या रत्नागिरीतील प्रॉपर्टीचा लिलाव झाला होता. एकूण 17 प्रॉपर्टींचा लिलाव यावेळी झाला. त्यापैकी 6 प्रॉपर्टी दाऊदच्या होत्या. तर एक प्रॉपर्टी इक्बाल मिरचीची आहे. 10 नोव्हेंबरच्या लिलाव प्रक्रियेत दाऊदच्या सात पैकी सहा जागांचा लिलाव झाला होता. लोटेतील मालमत्तेचा लिलाव मागे घेण्यात आला होता. आता या जागेचा सेफमा ऑनलाइन पद्धतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लिलाव करणार असून, दाऊदची ही मालमत्ता लिलावात कोण घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे.

दाऊदची मालमत्ता

1) सर्व्हे नंबर 151 वरील 27 गुंठे

2) सर्व्ह नंबर 152 वरील 29.30 गुंठे

3) सर्व्हे नंबर 152 वरील 24.90 गुंठे

4) सर्व्ह नंबर 150 वरील 20 गुंठे

5) सर्व्ह नंबर 155 वरील 18 गुंठे

6) सर्व्हे नंबर 181 वरील 27 गुंठे आणि हवेली

दाऊदच्या 4,5,7 आणि 8 क्रमांकाची मालमत्ता भूपेंद्र भारद्वाज यांनी विकत घेतल्या होत्या. तर 6 आणि 9 क्रमांकाची संपत्ती अजय श्रीवास्तव यांनी घेतली. तर दाऊदच्या 10 क्रमांकाच्या प्रॉपर्टीला परत घेण्यात आलं होतं. इक्बाल मिरचीची प्रॉपर्टी यंदाही लिलावात गेली नाही. लिलावात बोली लावणाऱ्यांच्या मते त्याच्या प्रॉपर्टीची किंमत जास्त लावण्यात आली आहे.

तीन पातळीवर लिलाव

टेंडरद्वारे

ई-टेंडरद्वारे

ई-ऑक्शनद्वारे

लिलावात मुंबके गावातील (Mumbake Village Khed) स्थानिक शेतकरी सहभागी झाले नव्हते. स्थानिक इच्छुक बोली लावण्यासाठी मुंबईत जाणार नाहीत, अशी माहिती माजी सरपंच अकबर दुदुके यांनी दिली होती.

ACTच्या अधिकाऱ्यांनी सोमवारपासूनच सर्व प्रॉपर्टी दाखवायला सुरुवात केली होती. मुंबईमधील दाऊदच्या जवळपास सर्व प्रॉपर्टींचा लिलाव केल्यानंतर आता त्याच्या रत्नागिरीतील जमीन आणि घराचाही जवळपास लिलाव झाला आहे. ही सर्व प्रॉपर्टी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे.

दाऊदच्या मालमत्तेच्या रकमा निश्चित

इब्राहिम दाऊदचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके आहे. दाऊदचे बालपण या गावात गेले. पण आता मोस्टवाँटेड डॉन म्हणूनही दाऊदचं नाव जगजाहीर करण्यात आलं आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाने रत्नागिरी जिल्ह्यातील दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावाच्या रकमा निश्चित केल्या होत्या. यात दाऊदच्या मूळ गाव असलेल्या मुंबके गावातील मालमत्तेची रक्कम 14 लाख 45 हजार रुपये, तर लोटे येथील आंब्याच्या बागेची किंमत 61 लाख 48 हजार निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, दाऊदची मालमत्ता खरेदीसाठी मुंबके गावातील गावकरीच सरसावले आहेत. दाऊदच्या मुंबकेमधील मालमत्तेचा दोन वेळा लिलाव जाहीर झाला होता, परंतु खरेदीसाठी कोणीही पुढे आले नव्हते.

मुंबके गावातील दाऊदची प्रॉपर्टी

मुंबके गावातील प्रॉपर्टी दाऊदची आई अमिना कासकर यांच्या नावावर आहे. आई आणि वडील दोघेही हयात नाहीत. 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम फरार झाला होता. दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव यापूर्वीच झाला होता. आता कोकणातील प्रॉपर्टीचा लिलाव केला जाणार आहे. कोकणातील दाऊदच्या वडिलोपार्जित मालमत्ता दाऊदचे काका कसत आहेत.

मागे

आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता
आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता

टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा ....

अधिक वाचा

पुढे  

राजस्थानच्या भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचा कोरोनामुळे मृत्यू, राजकीय क्षेत्रात हळहळ
राजस्थानच्या भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचा कोरोनामुळे मृत्यू, राजकीय क्षेत्रात हळहळ

राजस्थानच्या बेलगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल....

Read more